Chinchwad By-Election : Ashwini Jagtap
Chinchwad By-Election : Ashwini Jagtap Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : 'पेड न्यूज' प्रकरणी अश्विनी जगतापांना नोटीस ; काय केला खुलासा?

सरकारनामा ब्यूरो

Chinchwad By-Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune By-Election) उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच आता चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगान आता नोटीस पाठवली आहे. पेड न्यूज प्रकरणामुळे ही नोटीस आयोगाककडून देण्यात आली आहे.

विशेष समितीकडून पडताळणी :

पैसे देवून बातमी छापून आणल्याबाबत अश्विनी जगताप यांना नोटीस बजावली गेली आहे. एका वेबसाईट आणि एका साप्ताहिकामध्ये अशी एक बातमी समोर आली आहे. या सबंधित बातमीतला मजकूर पेड न्यूज सारखे असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

याबाबत नेमणूक केलेल्या माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती म्हणजेच एमसीएमसीने निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र पाठवले. अश्विनी जगताप यांना 16 फेब्रुवारी रोजी नोटीस पाठवण्यात आली होती. 20 फेब्रुवारीला याबाबत जगतापांचा खुलासा ही आल्याचे सांगण्यात येत आहे.

जगतापांचा हा खुलासा आता एमसीएमसी समितीकडे पाठवणयात आला असून, याची निकषानुसार छाणणी करून, यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT