पुणे : राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अध्यादेश जारी करण्यात आला. राज्य सरकारचा निर्णय झाला असला तरी यावर राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने यापूर्वी पुण्यासह राज्यात इतर महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश देऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते. हे काम सुरू असतानाच एक ऐवजी दोनचा प्रभाग होण्याच्या चर्चेने जोर पकडला होता. मात्र, राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अनपेक्षित असल्याने राजकीय पक्षासह इच्छुकांमध्ये खळबळ उडाली.
याचा निर्णयाचा फेरविचार केला जाणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले होते. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रयत्नांनंतरही हा निर्णय बदलण्यात आला नाही.राज्य सरकारचा हा प्रस्ताव राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला, त्यानंतर ३० सप्टेंबरच्या राजपत्रात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले असले तरी निवडणूक आयोगाने अद्याप महापालिकांना यासंबंधी आदेश दिलेले नाहीत. या आदेशात प्रभाग रचना कशी करावी, मतदारांची संख्या किती असावी, जातीनिहाय आरक्षण, महिला आरक्षण कसे निश्चीत करावे याचे निकष व निकष दिलेले असतात. त्यानुसारच महापालिकेच्या निवडणूक शाखेला प्रभाग रचना करावी लागते. आयोगाचे आदेश न आल्याने याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे आदेश आल्यानंतर प्रभाग रचनेचे काम सुरू होईल, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.