Bala Bhegade News, Ajit Pawar Latest Marathi News, Pune News, PM Modi Dehu Visit
Bala Bhegade News, Ajit Pawar Latest Marathi News, Pune News, PM Modi Dehu Visit  sarkarnama
पुणे

अजित पवारांच्या भाषणावरुन भाजप अन् देहू संस्थान आमने-सामने

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) देहू येथील कार्यक्रमांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी (Ajit Pawar) राज शिष्टाचार पाळला न गेल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर अजितदादांना भाषण न करु देण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप आणि देहू संस्थानच आमने-सामने आल्याचे दिसून आले. (Ajit Pawar Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केलेले आरोप फेटाळून लावत भाजप नेते माजी मंत्री संजय बाळा भेगडे (Bala Bhegade) म्हणाले, अजित पवारांना भाषण करायला लावायचे की नाही हा संपूर्ण अधिकार देहू संस्थानचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांना भाषणासाठी इशारा केला होता, असे भेगडे यांनी सांगितले. (Pune Latest Marathi News)

चर्चा आपण कशाची केली पाहिजे? या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आम्ही होतो. मात्र, आम्ही त्याठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था पाहत होते. पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्र्यांना भाषण करण्याची विनंती केली होती, हा त्यांचा मोठेपण आहे, असे भेडगे म्हणाले, तर देहू संस्थानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मोदी साहेबांचे भाषण आणि त्यांचा दौरा दिल्लीवरून येत असल्याने आम्हाला याबाबत काहीच माहित, नसल्याचा दावा नितीन महाराज मोरे यांनी केला.

दरम्यान, दरम्यान, या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रण नसल्यामुळे त्यावरुन आर्श्चय व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि मावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelake) यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्या मतदारसंघात हा कार्यक्रमात होता. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

याविषयी 'सरकारनामा'शी बोलताना बारणे म्हणाले, ``मी संत तुकाराम महाराजांचा भक्त आहे. पदावर नसल्यापासून मी वारीत सहभागी होत आहे. या कार्यक्रमाला मला जायला आवडले असते. हा देहू संस्थानचा कार्यक्रम होता. पण भाजपने तो कार्यक्रम आयोजित केला आहे, असे चित्र निर्माण झाले. यामध्ये पक्षीय राजकारण करणे योग्य नव्हते. या कार्यक्रमापासून स्थानिक प्रतिनिधींना दूर ठेवणे योग्य नव्हते. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असूनही निमंत्रण नसल्याने मला जाता आले नाही. माझी कोणावरही नाराजी नाही, पण भाजपने (BJP) हा कार्यक्रम हायजॅक केला, असा आरोपही बारणे यांनी केला. आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे मत कळू शकले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT