Aditya thackeray
Aditya thackeray Sarkarnama
पुणे

आमच्या 'त्या' निर्णयामुळे हजारो जीव वाचले : आदित्य ठाकरेंचं सरकारला प्रत्युत्तर

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यभरात गणपती विसर्जन पार पडत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी मिरवणुक निघत आहे. अशा जल्लोषमय वातावरणात युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गणेशोत्सवासाठी ते पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. सरकारमधील मंत्र्यांकडून आणि आमदारांकडून सण, उत्सव हे कसल्याही निर्बंधविना साजरे होत असल्याचा दावा केला जात आहे. यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हंटले की, कोरोना काळात जशी परिस्थिती होती त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आले. राज्यात निर्बंध लावल्यामुळेच आपण अनेकांचे प्राण वाचावू शकलो, नाहीतर महाराष्ट्रात देखील इतर राज्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असती. कोणत्याही धर्मात लोकांचा जीव वाचवण्याची शिकवण मिळते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यातील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं, मात्र अजूनही खाते वाटप मात्र झालेले नाही. पालकमंत्रीपदे अजूनही रिक्त आहेत." आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर असताना गणेशोत्सवाच्या धामधूमीत शिंदे, फडणवीस सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात मंत्र्यांना बंगल्याचं वाटप होतं, मात्र अजूनही खाते वाटप झालं नाही. जिल्हे पालकमंत्र्यांविनाच असल्याची आठवण, आदित्य ठाकरे यांनी सरकारला करून दिली.

सध्या याकूब मेमनचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. याविषयी आदित्य ठाकरे यांना प्रश्न केले असता, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. यावर आपण यावर याआधीच प्रतिक्रिया दिल्याचे त्यांनी म्हंटले. याकूब मेमनच्या कबरीशी महापालिका किंवा शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे, आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हटलं होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT