पुणे : इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार जरी झाला तरी त्यास ओबीसी समाज तीव्र विरोध करील. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशारा ओबीसींचे नेते प्रा. लक्षमण हाके यांनी दिला आहे.(Our strong oppose to reservation for Marathas from OBC quota: prof. Laxman Hake)
प्रा.हाके म्हणाले, ‘‘ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा.नोकरभरती सुरू करा, अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतिमोर्चे ओबीसी आणि भटक्या जाती जमातीच्या वतीने काढू. महाराष्ट्रातल्या 52 टक्के ओबीसी आणि भटक्या जाती जमातींना कोणीही गृहीत धरून बेताल वक्तव्ये करू नयेत. ओबीसींची ही भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी लवकर त्यांना भेटून निवदेन देणार आहोत.’’
प्रा.हाके म्हणाले, ‘‘ मराठा आरक्षणाबाबत विविध नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. मात्र, त्यासाठी ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला नख न लावता सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे.कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, याची काळजी राज्य सरकारने घेण्याची गरज आहे.’’
राज्यात ओबीसी समाजाचे प्रमाण एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्के आहे. ओबीसींची जनगणना करण्याची आमची जुनी मागणी आहे. त्यामुळे ओबीसींची ही जुनी मागणी सरकारने पूर्ण करायला हवी. ही जनगणना झाली तर सरकारला ओबीसींच्या संख्येचा खरा आकडा लक्षात येईल. तात्काळ जनगणना, नोकरभरती ही ओबीसींची जुनी मागणी आहे. ती लवकर पूर्ण करा अन्यथा या सामजाच्या रोषाला राज्य सरकारला सामोरे जावे लागले, असे प्रा. हाके यांनी सांगितले. ओबीसींच्या या जुन्या मागण्या आहेत. याकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ओबीसींच्या कोट्यातून सोडविण्याचा विचार जरी सरकारच्या डोक्यात आला तर राज्यातील तमाम वर्ग रस्त्यावर उतरेल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतिमोर्चे ओबीसी आणि भटक्या जाती जमातीच्या वतीने काढू असा इशारा प्रा.हाके यांनी दिला.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.