Crime News
Crime News Sarkarnama
पुणे

Pakistani Citizen Arrest News : पुण्यात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला अटक

सरकारनामा ब्युरो

Pune News : पुण्यात आठ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट तयार करून दुबई प्रवास केल्याचे समोर आले आहे.

महम्मद अमान अन्सारी (वय २२, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ) असे अटक केलेल्या पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष शाखेकडून शहरातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेत असताना महम्मद अन्सारी याच्याबाबत माहिती मिळाली. चौकशीदरम्यान, तो बेकायदेशीरपणे वास्तव करीत असल्याचे आढळून आले.

महम्मद अन्सारी याची आई मूळ भारतीय आहे. तिचा पाकिस्तानी नागरिक अमान यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्या पाकिस्तानला गेल्या. परंतु कौटुंबिक वादातून आई 'यूएई'मध्ये वास्तव्यास आहे. तिने महम्मदसह तिघा भावंडांना २०१५ मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आजीकडे पाठविले होते. पुण्यात शिक्षण घेत असताना महम्मद याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. या पासपोर्टच्या आधारे तो आईला भेटण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक वादामुळे पुण्यात वास्तव्य

आई 'युएई'मधील एका कंपनीत एचआर विभागात नोकरीस आहे. परंतु कौटुंबिक वाद आणि युएईमधील खर्च परवडत नसल्यामळे तिने महम्मदसह तिघा भावंडांना पुण्यात शिक्षणासाठी पाठविले होते. दर महिन्याला आई महम्मदला शिक्षणासाठी काही रक्कम पाठवत होती. त्याने भारतात वास्तव्याचा कालावधी वाढविण्याबाबत परदेशी नागरिक नोंदणी कक्षाकडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT