Palkhi Sohala : Sarkarnama
पुणे

Palkhi Sohala : ग्यानबा तुकाराम'च्या गजरात दुमदुमली अवघी पुण्यनगरी; दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी !

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala : वैष्णवांचा आनंचा सोहळा, भक्तिचा सोहळा..

सरकारनामा ब्यूरो

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala In Pune : वैष्णवांचा आनंदाचा मेळा, भक्तिभावाचा सोहळा.. अर्थात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या पुण्यनगरीतील भाविकांच्या डोळ्यांचे पारणे आज फिटले. (Latest Marathi News)

संध्याकाळीच्या वेळी दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत आगमने झाले आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ अशा अनुभूतीचा प्रत्यय विठुमाऊलींच्या भक्तगणांना आली. ‘ग्यानबा-तुकाराम ग्यानबा माऊली’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमली.

तीर्थक्षेत्र आळंदीवरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज तर आकुर्डीमार्गावरून जगद्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्याच्या दिशेने निघाल्या. कपाळी चंदनाचा टिळा... गळ्यात तुळशीची माळ... डोक्यावर तुळशी वृंदावन... हातात भगव्या पताका आणि टाळ-मृदंगांचा अखंड नाद... अशा भक्तीमय वातावरणात पालख्यांनी मार्गक्रमण केले. त्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. जागोजागी रांगोळ्या काढून रस्ते सजवण्यात आले होते. फुलांनी सजवलेले रथ दृष्टिपथास येताच नागरिक विठुनामाचा गजर करत होते. पालख्यांसमोरील दिंड्या मार्गस्थ होताना ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष केला जात होता. पालख्यांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

लाखोंच्या संख्येने वारकरी शहरात प्रवेश करते झाले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वयंशिस्तीचे दर्शन घडले. दिवसभर उन्हाचा चटका कायम असला तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांसह नागरिकांनी फुगड्यांचा फेर धरला.

टाळ-मृदंगांच्या तालावर ठेकाही धरला. या क्षणाची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे त्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT