Indapur Accident Sarkarnama
पुणे

Indapur Accident : पालखी मार्गावर कारचा टायर फुटला अन्...; काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू !

Indapur Congress Leader's Son Aditya Nimbalkar Dies in Accident :आदित्यची गाडी भरधाव वेगाने चालली होती. त्याच्या गाडीचा टायर फुटल्याने ती हायवेवर पलटी झाली.या अपघातामध्ये आदित्य गंभीर जखमी झाला होता

Chaitanya Machale

Baramati National Highway Accident : बारामतीत पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये काँग्रेस नेत्याचा 22 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रुई गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा आदित्य मुलगा आहे.

बारामती (Baramati) तालु्क्यातील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीकडे येत होता. त्याच्या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने गाडी पलटली आणि एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. यामध्ये आदित्य गंभीर जखमी झाला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आदित्यला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आदित्यची गाडी भरधाव वेगाने चालली होती. त्याच्या गाडीचा टायर फुटल्याने ती हायवेवर पलटी झाली.त्यानंतर ही कार एका इमारतीच्या कडेला जाऊन जोरदार आदळली.या अपघातामध्ये आदित्य गंभीर जखमी झाला.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.आदित्यच्या मृत्यूमुळे इंदापूर तालुका काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या आदित्यला गाडीतून बाहेर काढून जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पण, अपघातामध्ये आदित्यला झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती.रुग्णालयातच उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT