Senior wrestling patron and former Kharadi sarpanch Pandharinath Pathare Sarkarnama
पुणे

Pandharinath Pathare Death : आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबावर शोककळा : बंधू पंढरीनाथ पठारे यांचे निधन

Pune Wrestling Leader Pandharinath Pathare Passes Away : परिसरात अण्णासाहेब म्हणून ओळखले जाणाऱ्या पंढरीनाथ पठारे यांनी कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. तळागाळातील कार्यकर्ते, खेळाडू आणि विविध क्रीडा स्पर्धांना त्यांनी नेहमीच आर्थिक व नैतिक पाठबळ दिले. अनेक नामवंत पैलवानांचे ते मार्गदर्शक व आश्रयदाते म्हणून परिचित होते.

सरकारनामा ब्यूरो

Pune News, 12 May : वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे थोरले बंधू होते. तसेच ज्येष्ठ कुस्तीसंघटक, मल्लांचे आश्रयदाते पंढरीनाथ तुकाराम पठारे यांचे सोमवारी (ता.११) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

ते माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांचे वडील आणि नगरसेवक सुरेंद्र पठारे यांचे चुलते होते. परिसरात अण्णासाहेब म्हणून ओळखले जाणाऱ्या पंढरीनाथ पठारे यांनी कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. तळागाळातील कार्यकर्ते, खेळाडू आणि विविध क्रीडा स्पर्धांना त्यांनी नेहमीच आर्थिक व नैतिक पाठबळ दिले. अनेक नामवंत पैलवानांचे ते मार्गदर्शक व आश्रयदाते म्हणून परिचित होते.

कुस्तीतील योगदानासाठी त्यांना श्री. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कुस्तीसोबतच पंढरीनाथ पठारे हे पुण्यातील, विशेषतः खराडी भागातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठे व्यक्तिमत्त्व होते. ते खराडी गावचे १० वर्षे सरपंच होते.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे १५ वर्षे संचालक व सभापती होते. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे १५ वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. याशिवाय पुण्यातील कै. तुकाराम धोंडिबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

पंढरीनाथ पठारे यांचे वडील, कै. तुकाराम पठारे, हे देखील २५ वर्षे खराडीचे सरपंच होते. पठारे कुटुंबीयांना मल्लविद्येची आणि राजकारणाची मोठी परंपरा आहे. मंगळवारी (दिनांक १२ मे २०२६) सकाळी १० वाजता खराडी गाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT