Pankaja Munde  Sarkarnama
पुणे

Pankaja Munde News : '...तर आम्ही भाजपचं कामच करणार नाही!'; पंकजा मुंडेंना कुणी दिला इशारा अन् का?

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्राथमिक चर्चा महायुतील आघाडीतील मित्र पक्षांमध्ये सुरू आहे. या प्राथमिक चर्चांमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला सोडण्याबाबत सर्व पक्षातील वरिष्ठांचा एकमत झाला असल्याचा सांगण्यात येत आहे. अशातच वडगाव शेरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडल्यास आम्ही कामच करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने तयारी सुरू केली आहे. राज्यातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

पंकजा मुंडे सध्या पुणे दौऱ्यावर असून बुधवारी (ता. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या आढावा बैठकीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा अन्यथा आम्ही कामच करणार नाही असं पत्र पंकजा मुंडे यांना वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जगताप यांनी दिल आहे.

नेमकं काय म्हटलंय पत्रात?

येत्या विधानसभा 2024 साठी वडगावशेरी मतदारसंघामधून उमेदवारी भाजपच्या सदस्याला मिळावी अशी तीव्र इच्छा येथील भाजपचे स्थानिक नेते व सर्व कार्यकर्त्यांची आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची विचारसरणी रुजवण्यात व कार्यकर्ते घडविण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांचा मोलाचा वाटा आहे.

2014 पूर्वी या मतदारसंघात भाजपाचे एकच नगरसेवक होते. 2014 ला जगदीश मुळीक हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपाचे एकूण 14 नगरसेवक निवडून आले.

वडगावशेरी मतदारसंघ हा लोकसंखेच्या दृष्टिने मोठा असून या ठिकाणी अंदाजे 4,70,000 एवढे मतदार आहेत व यामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचा समावेश असून अलीकडील काळात परप्रांतीयांचे प्रमाण वाढले आहे. यातील बहुसंख्य मतदार हे भाजपाच्या विचारसरणीशी अनुकूल असून ही पक्षाच्या उमेदवारासाठी जमेची बाजू आहे असेही पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये वडगावशेरी मतदारसंघात आपले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे असताना देखील केवळ भाजपाच्या कार्यकुशलतेमुळे या मतदारसंघात अंदाजे 15,600 पेक्षा जास्तीच्या लिडने निवडून आले. परंतु सांगताना खंत वाटते की, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित दादा गट) या घटक पक्षाचे विद्यमान आमदार महायुतीत असताना देखील त्यांनी महायुतीस कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले नसून उलट उमेदवाराविरोधात काम केलेले आहे. जर त्यांनी महायुती धर्म पाळला असता व खंबीरपणे साथ दिली असती तर मुरलीधर मोहोळ यांचे लीड अजून वाढले असते.

त्यामुळे जर विधानसभा 2024 साठीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) पक्षास गेली तर वडगावशेरी मतदारसंघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून त्या उमेदवारास कुठल्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही कृपया याची नोंद घ्यावी. तरी आपण या विषयाची दखल घेऊन विधानसभा 2024 साठीची वडगावशेरी मतदारसंघातील उमेदवारी भाजपच्या सदस्यास मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी मागणी पक्षाच्या पदाधिकार्यांंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT