Arvind Kejriwal Latest News  Sarkarnama
पुणे

AAP issues whip to MP : 'आप'कडून खासदारांना व्हीप जारी ; संसदेचे दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरळीत होणार ?

सरकारनामा ब्यूरो

Pimpri : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे या आठवड्यात सूप वाजणार आहे. दुसरीकडे संसदेचे अधिवेशन दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करीत आहे. मात्र,पहिल्या आठवड्याचे कामकाज विरोधकांच्या मणिपूरवरील चर्चेच्या गोंधळातून झालेले नाही. मात्र, दुसऱ्या आठव़ड्यात ते होण्याचे संकेत मिळाले आहेत.

आम आदमी पार्टीने (आप) दुसऱ्या आठवड्यात ३१ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महत्वाची विधेयके येणार असल्यामुळे त्यांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून दुसऱ्या आठवड्यात कामकाज होईल, असे संकेत मिळत आहेत.

विरोधकांच्या `इंडिया`आघाडीकडून त्यात खोडा घातला जाण्याची शक्यताही आहे. कारण त्यांचे खासदार कालच मणिपूरला आणि तेथून राज्यपालांना भेटून आले आहेत. ते हा मुद्दा पुन्हा आज व या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करतील, असा अंदाज आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरातील हिंसाचारावर सभागृहात बोलावे यावर अद्याप ठाम आहेत. त्यामुळे मोदी संसदेत मणिपूरवर बोलणार का याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, संसदेतील कामकाजाची कोंडी कशी फुटते हे थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे.

मणिपूरमध्ये निर्वस्त्र धिंड प्रकरणी दोन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोघींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात अपील केले आहे.मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड खंडपीठ आज सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे आदिवासी भागात स्वतंत्र प्रशासनाच्या मागणीसाठी कुकी महिलांनी गेल्या पाच दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 102 रोखून धरला आहे. कुकी संघटनांच्या हजारो महिलांनी टेंगनौपाल येथे मोरेह​​​कडे जाणाऱ्या लष्कराच्या दहा वाहनांना रोखले. त्यानंतर सैनिकांना एअरलिफ्ट करून मोरेह येथे पाठवावे लागले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT