Parth Pawar sarkarnama
पुणे

पार्थ पवार म्हणतात 'सिर्फ हंगामा नही'...तरी हंगामा होणारच!

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) मैदानात उतरले.

सरकारनामा ब्युरो

पुणे : : पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पिंपरी-चिंचवड शहरावर (Pimpri-Chinchwad) वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) मैदानात उतरले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भष्ट्राचार बाहेर काढण्यासाठी पार्थ पवार यांनी दंड थोपटले आहे. पार्थ पवार यांनी टि्वट केलं आहे. “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।”, असं टि्वट पार्थ पवार यांनी केलं आहे. भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत ता. 16 ऑक्टोबरला मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यावर अजित पवार यांच्याकडे पिंपरी शहराची सूत्र आली. अजित पवारांनीहीआपल्या कामाची छाप विकासकामांच्या माध्यमातून उमटवली. या काळात अनेक जुनेजाणते नाराज झाले. 2017 च्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीवरुन अनेक जण नाराज झाले होते.

मातेसमान नदीतून पैसे खाण्याच्या या भ्रष्टाचाराच्या मूळापर्यंत जाणार असल्याचा इशारा पार्थ पवार यांनी काल (ता. १३) दिला. हीच का स्मार्ट सिटी असा प्रश्नही त्यांनी विचारला. पवार व लांडे या जोडीने शहरातील इतर प्रश्नांतही लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. त्यातून चार महिन्यांवर आलेल्या पिंपरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते अधिक सक्रिय व आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पार्थ यांच्या इशाऱ्याने भाजपच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT