Sharad Pawar with Parth Pawar and Jay Pawar during the Pawar family meeting at Vidya Pratishthan. sarkarnama
पुणे

Pawar Family Meeting : सलग दुसऱ्या दिवशी पवार कुटुंबामध्ये बैठक, नेमकं कारण काय?

Sharad Pawar Parth Pawar Jay Pawar : बारामतीमधील विद्या प्रतिष्ठाण संस्थेमध्ये पवार कुटुंबाची बैठक होत आहे. या बैठकीला शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित आहेत.

Roshan More

Baramati News : अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबामधील एकी दिसून आली. विद्या प्रतिष्ठाण संस्थेमध्ये बुधवारी (ता.4) शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला पार्थ पवार, जय पवार यांच्यासह अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्यासह विद्या प्रतिष्ठाण संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.

बुधवारी झालेल्या या बैठकीनंतर आज (गुरुवारी) सलग दुसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीला पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. शरद पवार, प्रतिभा पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवाह हे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

या बैठकीला पार्थ पवार, जय पवार युगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विविध विषयांवर बैठक होणार असल्याची सांगितले जात आहे. मात्र, ही बैठक काय आयोजित करण्यात आली आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला हजर राहणार की नाही याबाबत देखील स्पष्टता नाही.

'त्या' जागांबाबत निर्णय होणार?

अजित पवार हे विविध संस्थामध्ये होते. विद्या प्रतिष्ठाणचे विश्वस्त, माळेगाव साखर कारखाण्याचे चेअरमन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये देखील ते पदावर होते. त्यांच्या या रिक्तपदावर पवार कुटुंबातील कोणाला संधी द्यायची यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT