walse pawar 
पुणे

पवार साहेब तेंव्हा मला म्हणाले थोडं थांबा .. आणि मी थांबलो : दिलीप वळसे

पवार साहेबांचं ज्यांनी-ज्यांनी ऐकलं त्यांचं भलं झालआहे. आणि पवार साहेबांचे सल्ले न ऐकलेल्या मान्यवरांचे राजकारण काय होते हे आपण सर्व जण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. - दिलीप वळसे-पाटील

डि के वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून 1985 मध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा मी  ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांकडे व्यक्त केली होती. पण त्यावेळी ते मला म्हणाले "तुम्ही अजून निवडणूक जिंकण्याच्या कॅटेगरीत बसत नाही त्यामुळे थोडे थांबा ,"असा पवार साहेबांनी दिलेला सल्ला मी पाळला .

त्यामुळेच सलग सात वेळा या मतदारसंघातून वाढत्या उच्चांकी मताधिक्‍याने विजयी झालो .माझ्या राजकारणातील यशाचे सर्व श्रेय पवार साहेबांना च आहे.असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.


निरगुडसर ह्या आपल्या गावी मंगळवारी भाऊ बीजे निमित्त आयोजित केलेल्या आभार बैठकीत वळसे-पाटील बोलत होतेयावेळी मेंगडेवाडी, निरगुडसर, जवळे भराडीगावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.


वळसे-पाटील म्हणाले ,पवार साहेबांचं ज्यांनी-ज्यांनी ऐकलं त्यांचं भलं झालआहे. आणि पवार साहेबांचे सल्ले न ऐकलेल्या मान्यवरांचे राजकारण काय होते हे आपण सर्व जण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. 1981 मध्ये माझे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले. पवार साहेबांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. चौफेर वाच न, प्रचंड आत्मविश्वास, जिद्द वक्तशीरपणा व समयसूचकता हे त्यांच्याकडे असलेले गुण मी  अनुभवले आहेत. राजकारणात प्रतिकूल व अनुकूल परिस्थितीत कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. 


1985 मध्ये पुलोद एकत्रित निवडणूक लढवत होते. मलाही आंबेगाव मधून निवडणूक लढवावीअसे वाटत होते. मी तसा प्रस्तावही पवार साहेबां समोर ठेवला होता.पण जरा थांबा असा सल्ला पवार साहेबांनी मला दिला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत एस काँग्रेस म्हणून माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील, बी डी काळे व मी विधानसभा निवडणुकीत लोक नेते किसनराव बाणखेले यांचा मनापासून प्रचार केला. बाणखेले निवडूनही आले.


1990 मध्ये पवार साहेबांनी माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. तेव्हापासून आजतागायत झालेल्या सातवी निवडणुकांमध्ये गावकऱ्यांनी, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील 39 गावांनी तसेच जुन्नर तालुक्यातील 14 गावांनी दिलेली साथ मी कधी ही विसरू शकणार नाही.


भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांनी भाषणात पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असा युक्तिवाद केला होता. हा धागा पकडून वळसे-पाटील म्हणाले,  अहो साताऱ्यात पवारसाहेब भर पावसात भाषण करत होते त्यावेळी ते अजिबात विचलित झाले नाहीत .  ऐंशी वर्षाचा योध्या जर न डगमगता मुसळधार पावसाचा सामना करतोय तर आपण मतदानाच्या टक्केवारीत का कमी पडतो याचे आत्मचिंतन सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे, असे सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विधानसभा निवडणूक प्रचारात शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराने भाकीत केले होते की की सहा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त केले जातील. पण जनता जनार्दनाच्या पाठिंब्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातून 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आणि शिवसेना मुक्त हा मतदार संघ झालेला आहे. यापुढेही होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मला ग्रामस्थ व मतदार संघातील जनतेने द्यावी,  असे आवाहनही वळसे-पाटील यांनी केले. 


दर महिन्यातून एक दिवस निरगुडसर ग्रामस्थांसाठी दिला जाईल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावरही भर दिला जाईल युवक महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांच्याशी थेट अधिक संपर्क वाढविण्याचा माझा प्रयत्न राहील. विकासकामांचा वेग कायम ठेवू अशी ग्वाही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी दिली.


पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील. सरपंच उर्मिला वळसे-पाटील, बाबासाहेब खालकर ,प्रदीप वळसे पाटील, पोपटराव मेंगडे, रमेश खिलारी, गोविंद खिलारी, डॉक्टर शांताराम गावडे,सुरेश टावरे, फकीरा वळसे-पाटील, प्रमोद वळसे-पाटील, के जी वळसे-पाटील आदींची मनोगते झाली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT