पुणे

जर काम केले असेल तर कर्जत मतदारसंघातील लोक मला निवडून देतील - प्रा. राम शिंदे

यशपाल सोनकांबळे

पुणे  : लोकशाही आहे त्यामुळे कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी याला बंधन नाही. ज्यांना उभे राहायचे आहे त्यांचे स्वागत आहे. परंतु, भारतीय जनता पक्षाने जर उमेदवारी दिली तर समोर कोणीही असो मी निवडणूक लढविणार. जर मी पाच वर्षात चांगले काम केले असेल तर कर्जत मतदारसंघातील लोक मला निवडून देतील, असा विश्‍वास राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव न घेता व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेळ पडली तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राम शिंदे आणि अजित पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर कर्जत मतदारसंघातून रोहित पवार यांचे नाव चर्चेत आहे.

या पार्श्‍वभूमीवर 'सकाळ'ने प्रश्‍न विचारल्यानंतर राज्यमंत्री शिंदे म्हणाले,"अजित पवार यांनी जे संकेत दिले ते काही माझ्यापर्यंत पोचले नाहीत. पण जर कोणी त्याठिकाणी थांबण्याचा विचार करीत असतील तर त्यांचे स्वागत आहे. पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढविणार आहे. विजयी कोणाला करायचे हे लोक ठरवतील, जर पाच वर्षांमध्ये माझे काम चांगले असेल तर मतदार मला निवडून देतील.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT