Anti Corruption Raid in Police Chowky
Anti Corruption Raid in Police Chowky Sarkarnama
पुणे

पोलीस चौकीतच पाच हजारांची लाच घेताना सहायक फौजदार अडकला जाळ्यात

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात पोलिसांच्या लाचखोरीची प्रकरणे उघडकीस येण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. बुधवारी (ता. २५) चिंचवड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला पोलीस चौकीतच पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडले. विठ्ठल अंबाजी शिंगे (वय ५७) असं या 'एएसआय'चं नाव आहे. (Pimpri Chinchwad Latest Marathi News)

लाचखोर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याला याअगोदरचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश तथा केपी हे लगेच थेट घरचा रस्ता दाखवत होते. त्यामुळे आताचे आयुक्तही तोच कित्ता गिरवणार का याकडे पोलिस खातेच नाही, तर सर्वांचेच लक्ष लागले आहे. २० एप्रिलला केपींची राज्य सरकारने अचानक मुदतपूर्व बदली केली. (ASI arrested by Anti corruption Department)

कृष्णप्रकाश यांच्या गैरहजेरीत दुसऱ्याच दिवशी अंकुश शिंदे यांनी नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर सव्वा महिन्यात आयुक्तालयातील पोलिस लाचखोरीत पकडला गेला आहे. भावाविरुद्धचा तक्रारी अर्ज, भावाच्या पत्नीच्या पोस्टमार्टेम नोट्स (शवविच्छेदन अहवाल) आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी शिंगे यांनी एका तरुणाकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.

पंचवीस हजारावर तडजोड झाली होती. त्यातील पहिला हफ्ता म्हणून पाच हजार रुपये वाल्हेकरवाडी चौकीत घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनीटने पकडले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी वा लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे एसीबीचे अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT