Pimpri Chinchwad BJP leaders compete for city president post. Sarkarnama
पुणे

BJP News : भाजप शहराध्यक्षपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांची फिल्डिंग; कोण होणार नवा नायक?

New BJP Leader Pimpri : भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांच्या गटांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने शहराध्यक्षपदासाठी पक्षातील जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच आहे.

Hrishikesh Nalagune

BJP Pimpri Chinchwad Politics: भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांच्या गटांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने शहराध्यक्षपदासाठी पक्षातील जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या आठ नवीन निकषांनुसार शहराध्यक्षाची निवड होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये आमदार महेश लांडगे, विद्यमान शहराध्यक्ष, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आणि जुना असे एकूण चार गट आहेत. जुन्या गटात माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या चारही गटांनी शहराध्यक्षपद आपल्याकडेच रहावे यासाठी ताकद पणाला लावली आहे.

8 जण इच्छुक :

शहराध्यक्षपदासाठी आतापर्यंत 8 इच्छुकांची नावे समोर आली आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक यांच्या नावांची चर्चा आहे. तर नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजय फुगे इच्छुक आहेत.

विद्यमान शहराध्यक्षांचं मत विचारात घेणार?

विद्यमान शहराध्यक्ष म्हणून आमदार शंकर जगताप काम करत आहेत. तर शत्रुघ्न काटे कार्यकारी अध्यक्ष आहेत. काटे हे जगताप यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जातात. त्यामुळे विद्यमान शहराध्यक्षांचं मत विचारात घेतल्यास जगताप हे काटे यांच्यात पारड्यात आपले वजन टाकू शकतात. त्यामुळे जगताप यांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरल्यास जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होऊ शकते.

ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास प्राधान्य :

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता येण्यापूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आमदार महेश लांडगे व आमदार शंकर जगताप यांनी सलग शहराध्यक्षपद भूषविले. त्यामुळे यंदा तरी किमान जुन्या फळीतील नेत्याला संधी द्यावी अशी मागणी होत आहे. वरिष्ठ पातळीवरूनही ज्येष्ठ पदाधिकारी निवडण्याचा निर्णय झाल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे.

आठ निकषांनुसार होणार निवड :

- अनुशासित व प्रामाणिक व्यवहार असलेला इच्छुक उमेदवार असावा

- इच्छुक उमेदवार पक्षातील अनुभवी कायकर्ता असावा

- त्या उमेदवाराने यापूर्वी संघटनेच्या जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे

- इच्छुक उमेदवार हा किमान दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे

- नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा शहर-जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही

- इच्छुक उमेदवार आमदार, खासदार नसावा

- महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांचे नाव खालून आलेच पाहिजे

- शहर-जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार 45 ते 60 वयोगटातील असावा.

पक्षाच्या वतीने या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा निरीक्षक म्हणून खासदार धनंजय महाडीक, पर्यवक्षक म्हणून आमदार सिद्धार्थ शिरोळे व प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

हे पदाधिकारी शहरात 28 एप्रिलपर्यंत येऊन पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेतील. त्यानंतर 29 एप्रिलपर्यंत प्रदेश भाजपकडे अहवाल पाठविला जाईल. 30 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे प्रदेशाध्यक्षंसह राज्यातील सर्व शहर-जिल्हा अध्यक्षांची घोषणा केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT