pimpri chinchwad bjp
pimpri chinchwad bjp sarkarnama
पुणे

मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या प्रतिमेला भाजपने मारले जोडे!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मी मोदींना शिव्या देऊ शकतो. मारु शकतो, असे आक्षेपार्ह वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सोमवारी (ता. १७ जानेवारी) भंडारा येथे केले होते. त्याचे तीव्र पडसाद लगेचच पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी (ता. १८ जानेवारी) उमटले. शहर भाजप व शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध आणि संताप व्यक्त केला. या वेळी पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यासुद्धा या जोडे मारो आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. (Pimpri Chinchwad BJP protests Nana Patole's statement)

भंडारा येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान पटोले यांनी मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘‘आपण मोदीला मारुही शकतो व शिव्याही देवू शकतो…’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे पटोले यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात भाजपकडून संताप व्यक्त होत आहे. त्याला पिंपरी-चिंचवडही अपवाद नाही. दरम्यान, आपण मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत असे वक्तव्य केल्याचा ‘यू टर्न’ पटोलेंनी वाद निर्माण होताच आज घेतला आहे.

शहर भाजप जनसंपर्क कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षाचे शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू दुर्गे, विजय फुगे, नगरसेवक तुषार हिंगे, कुंदन गायकवाड,अनुराधा गोरखे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे तसेच विशाल वाळुंजकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, ओबीसी सेल पश्चिम महाराष्ट्र संयोजक वीणा सोनवलकर,मंडल सरचिटणीस नंदू भोगले आदींनी भाग घेतला. मुर्दाबाद…मुर्दाबाद.. नाना पटोले मुर्दाबाद…, नाना पटोलेचे करायचं काय, खाली डोकं, वर पाय अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT