Sunil Shelke On Sharad Pawar :  Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्र्वादीत जुंपली, शरद पवारांना जाब विचारणाऱ्या आमदार शेळकेंची बाफनांनी लायकीच काढली!

Sunil Shelke On Sharad Pawar : सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा...

Uttam Kute

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गुरुवारी (ता.७) लोणावळ्यात झालेल्या मेळाव्यात त्याला न जाण्यासाठी कार्यकर्त्यांना दमबाजी करणारे अजित पवार गटाचे स्थानिक मावळचे आमदार सुनील शेळकेंना शरद पवारांनी आपल्या भाषणात सज्जड दम दिला. त्यावरून दोन्ही राष्ट्रवादीत लोकसभा निवडणुकीपूर्वीच कलगीतुरा रंगला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आपण एकालाही दमदाटी केली नसल्याचा खुलासा लगेचच शेळकेंनी केला. तसेच तो करणारे पवारसाहेबांना भेटून त्याबाबत विचारणा करणार आहे, असे ते म्हणाले. त्यावर शरद पवार राष्ट्रवादीचे मावळातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना आक्रमक झाले. सरकारनामाशी बोलताना त्यांनी शेळकेंची लायकीच काढली. सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. यातून मावळात दोन्ही राष्ट्रवादीत जोरदार जुंपल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तो काय साहेबांना विचारणार, त्याची लायकी आहे का, अशी विचारणा बाफनांनी केली. तो साहेबांना काय भेटतो, मी देतो पुरावे असे ते म्हणाले. तालुक्यात मी प्रमुख असताना मला पहिलं विचारायला पाहिजे. त्याऐवजी तो (शेळके) थेट शरद पवारांकडे जातोच कसा? पहिलं खालचं कोर्ट, मग हायकोर्ट, थेट सुप्रीम कोर्टात कसा जातो, असा सवाल त्यांनी केला.

आपल्यालाही शेळकेंनी कशी दमबाजी केली होती. याची आठवण या निमित्ताने बाफनांनी सांगितली. वडिलधारे असलेल्या बाफनांनी आमच्या नेत्यावर (अजित पवार) टीका करू नये. नाहीतर त्यांचे सगळेच बाहेर काढू, असे शेळके एका मेळाव्यात म्हणाले होते. असे सांगत, जर ते मला दम देत असतील तर या मेळाव्याला न येण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी नक्कीच तो दिलेला असणार, असे ते बाफना ठामपणे म्हणाले. काही तरी अर्थ असल्याशिवाय शरद पवार असे शेळकेवर बोलणारच नाहीत, असे त्यांनी निक्षून सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT