Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News : Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad News : प्रश्नाचा पाठपुरावा लांडगे आणि जगतापांचा, लवकरच पुर्तता होणार ; बारणेंची घोषणा !

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : पिंपरी प्राधिकरणबाधित शेतकऱ्यांना गेली ४० वर्षे न मिळालेला साडेबारा टक्के जमीन परतावा १५ दिवसांत देण्याची घोषणा राज्य सरकारने गतवर्षी डिसेंबरमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही तो देण्यात आलेला नाही.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणबाधित शेतकऱ्यांना हा साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याबाबतचा जीआर येत्या आठ दिवसांत काढणार असून तसे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane) यांनी आज दिली.

1972 ते 1983 दरम्यान प्राधिकरणासाठी जमिनी दिलेल्या शेतक-यांना सव्वासहा टक्के जमीन आणि 2 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) या स्वरुपात तो दिला जाणार आहे. प्राधिकरणबाधितांसह मुख्यमंत्री शिंदे यांची खा.बारणे यांनी मुंबईत भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या आठ दिवसात याबाबत शासन आदेश निघेल अशी ग्वाही दिली

भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी साडेबारा टक्के परतावा मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता.विधानसभेत त्यांनी याबाबत ताराकिंत प्रश्न विचारून आणि लक्षवेधी देऊन सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना येत्या १५ दिवसांत हा परतावा दिला जाईल,अशी घोषणा सरकारने हिवाळी अधिवेशनात गत डिसेंबरलमध्ये केली होती.मात्र,तो तीन महिन्यानंतरही अद्याप देण्यात आलेला नाही.

दरम्यान,चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात फेब्रुवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेची पूर्तता केली जाईल,असे आश्वासन पुन्हा दिले होते. त्यालाही महिना उलटून गेला आहे. मात्र,या घोषणेची पूर्तता झालेली नव्हती.

दुसरीकडे डिसेंबरमध्येच साडेबारा टक्के परताव्याची घोषणा सरकारने करताच लगेच पिंपरी-चिंचवड भाजपने जल्लोष केला होता.तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत त्याचे श्रेयही घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT