CP Krishna Prakash  Sarkarnama
पुणे

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना साईड पोस्टींग; चर्चेला उधाण...

IPS Krishna Prakash : पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मुंबईतून स्पेशल आयजी अंकुश शिंदे हे आले आहेत.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (IPS Krishna Prakash) यांची अचानक बुधवारी (ता.२० एप्रिल) मुदतपूर्व बदली झाली. अल्पावधीत आपल्या कामाचा छाप पाडूनही धडाकेबाज कृष्णप्रकाश यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर त्यांना साईड पोस्टींग मिळाल्यानेही चर्चेला उधान आले आहे. त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे (IPS Ankush Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तालय निर्माण झाल्यापासून आतापर्यंत लाभलेल्या तिन्ही आय़ुक्तांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. १५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयाची स्थापना झाली. पहिले आय़ुक्त के.पद्मनाभन हे आले. ते या पदावर असतानाच १९ सप्टेंबर २०१९ ला निवृत्त झाले. त्यांच्याजागी दुसरे आय़ुक्त के. एल. विष्णोई यांची, तर एका वर्षाच्या आतच २ सप्टेंबर २०२० ला बदली झाली होती. त्यानंतर तिसरे आय़ुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांनी ५ सप्टेंबर २०२० ला पदभार हाती घेतला होता. त्यांचीही दीड वर्षातच बदली झाली. त्यांच्या बदलीने मुदतपूर्व बदलीची हॅटट्रीक झाली. त्यांची बदली विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणजे स्पेशल आय़जी (व्हीआय़पी सुरक्षा) म्हणून मुंबईत झाली आहे. ते मुंबईत राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात स्पेशल आयजी (प्रशासन) पदावरून पिंपरी-चिंचवडला आले होते. त्यांच्या जागी आता शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मुंबईतून स्पेशल आयजी (सुधार सेवा) अंकुश शिंदे हे आले आहेत. त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून आपल्या कामाची छाप पाडलेली आहे. तेथील गुन्हेगारी मोडीत काढीत अवैध धंद्यावर अंकुश ठेवला होता. राष्ट्रपतींच्या पोलिस पदकाचे ते मानकरी आहेत.

आपल्या कार्यकाळात कृष्णप्रकाश यांनी दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली होती. मात्र, एका पोलिस चकमकीत ते वादग्रस्त ठरले होते. अवैध धंद्याविरुद्ध त्यांनी मोहीम उघडली होती. बेकायदेशीर धंद्यांना आश्रय देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. लाचखोरांना ते सरळ घरचा रस्ता दाखवत होते. मुंबईचे पोलिस आय़ुक्त संजय पांडे यांच्याप्रमाणे त्यांनी आपला मोबाईल नंबर पिंपरी-चिंचवडकरांना दिला होता. त्यावर मिळणाऱ्या माहितीनुसार ते कारवाई करीत होते. पोलिस दल फीट रहावे म्हणून त्यांनी त्यांना सायकली आणि स्मार्ट वॉच दिली होती. अल्पवयीन गुन्हे वाढल्याने या गुन्हेगारांना सुधारण्याकरिता त्यांनी समुपदेशन केंद्र सुरु केले होते. त्यांना विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यास त्यांनी सुरवात केली होती. त्यातून त्यांनी झुंड या चित्रपटासारखी या बालगुन्हेगारांची फूटबॉल टीम तयार केली होती. दिवाळी ते विशेष मुलांसोबत साजरी करण्याचा पायंडा त्यांनी येथेही सुरु ठेवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT