Pimpri News : ACB Sarkarnama
पुणे

Pimpri News : 'एसीबी'चा धडाका, दुसऱ्या दिवशीही पुण्यात लाचखोरांविरुद्ध कारवाई !

Pimpri News : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार,मृत मजूराच्या विम्याची रक्कम देण्यासाठी मागितली लाखाची लाच

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News : पुणे `महावितरण`चे विधी सल्लागार सत्यजीत पवार आणि सहाय्यक विधी अधिकारी समीर चव्हाण अशा वर्ग एकच्या दोन अधिकाऱ्यांना काल (ता.१४) `व्हॅलेंटाईन`च्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटने चाळीस हजार रुपयांची लाच घेताना, अटक केली होती. तर, आज याच युनिटने एक लाख रुपयांची लाच मागून त्यातील पहिला दहा हजाराचा हफ्ता घेताना, दोघांना पुण्यातच शिवाजीनगर येथील कामगार कार्यालय आवारात पकडले.

आजच्या लाचखोरीतील संतापाची बाब म्हणजे एका नोंदणीकृत महिला मजूराच्या मृत्यूनंतर त्यांच्या विम्याचे पैसे देण्यासाठी या मयताच्या मुलाकडे एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यातील पहिला दहा हजार रुपयांचा हफ्ता घेताना दोन खासगी व्यक्ती तथा कामगार कार्यालयातील दलालांना पकडण्यात आले. त्यात एक महिला आहे. योगिता अरुण शेंडगे (वय ४०, रा. थेरगाव)आणि फारुक हनीफ पठाण (वय ५६,रा. बोपोडी) अशी या लाचखोरांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या लाचखोरीत कामगार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार २१ वर्षीय तरुणाची आई या नोंदणीकृत बांधकाम मजूर होत्या. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्य़ाण मंडळात त्यांनी बांधकाम मजूर म्हणून नोंद होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्यांचे निधन झाले. त्यांच्या वारस मुलाला त्यांच्या कामगार विम्यापोटी दोन लाख ३४ हजार रुपये मिळणार होते. ते मिळवून देण्यासाठी वरील दोघांनी एक लाख रुपयांची मागणी या मृत मजूराच्या मुलाकडे केली होती. त्यातील अॅडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये शिवाजीनगर येथील कामगार कार्यालयाच्या आवारातच घेताना, या जोडगोळीला पकडण्यात आले. एसीबीच्या पीआय प्रणेता सांगोलकर पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT