Dattatray Bharne Sarkarnama
पुणे

Dattatray Bharane News : शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा होणार; कृषिमंत्र्यांनी सांगितली तारीख

PM Kisan Samman Nidhi: Seventh Installment Update : सरकारच्या तिजोरी मधून 1932 कोटी 72 लाख रुपये या हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना थोड्याभोत प्रमाणात होणार असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News : केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत निधीचा हप्ता मागील महिन्यातच वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर राज्याकडून नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारा हप्ता कधी देण्यात येणार, याबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा करण्यात येत होती. त्याबाबत आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

नमो शेतकरी सन्माननिधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सातवा हप्त्यासंदर्भातील जीआर सरकारने कालच काढला आहे. त्यानुसार राज्यातील 92 लाख 36 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा हप्ता दिला जाणार आहे. या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, असे भरणे यांनी सांगितले.

येत्या मंगळवारी हा कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. मात्र कदाचित हा कार्यक्रम बुधवारी देखील होऊ शकतो. या कार्यक्रमानंतर या 92 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन पद्धतीने हे पैसे जमा होणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. यासाठी सरकारच्या तिजोरी मधून 1932 कोटी 72 लाख रुपये या हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना थोड्याभोत प्रमाणात होणार असल्याचं भरणे म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारने येत्या 16 सप्टेंबरपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिनापासून पुढील 100 दिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे प्रत्येक गावाने स्वतःचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. शासनाने या अभियानासाठी तब्बल 245.20 कोटी रुपयांची बक्षीस योजना आखली आहे. यातून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावरील स्पर्धा होणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे.

स्वच्छता, शाश्वत विकास, हरित उपक्रम, महिला व बालकांच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकार आदी निकषांवर गावांचे मूल्यमापन होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT