PMC Election BJP Strategy Sarkarnama
पुणे

BJP PUNE: उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकांना बसणार शॉक; नव्या चेहऱ्यांना संधी?

PMC Election BJP Strategy: गुजरात मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्या ठिकाणी असलेल्या विद्यमान आमदारांसह मंत्र्यांची देखील तिकीट कापली होती. नवीन उमेदवारांना संधी दिली होती.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे महापालिकेमध्ये भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं आता जवळपास निश्चित झाला आहे. या युतीमध्ये 165 पैकी 135 जागा भाजप लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर 30 जागांवर शिंदेंच्या सेनेला समाधान मानावं लागू शकतं.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत जवळपास भाजप 135 जागा लढणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी आपली उमेदवारी फिक्स असल्याचं सांगत निवडणुकीची तयारी करण्यात सुरुवात केली आहे. मात्र या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी नगरसेवकांना भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे.

सध्या भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीत गुजरात पॅटर्न वापरणार असल्याचं बोललं जात आहेत. गुजरात मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्या ठिकाणी असलेल्या विद्यमान आमदारांसह मंत्र्यांची देखील तिकीट कापली होती. नवीन उमेदवारांना संधी दिली होती. पद्धतीने भाजप पुण्यामध्ये देखील 40 माजी नगरसेवकांचा पत्ता कट करणार असल्याचं समोर आला आहे.

ज्या माजी नगरसेवकांचे पत्ते कट होणार आहेत, त्यामागे काही कारण आहेत त्यातलं प्रमुख कारण हे प्रभाग रचनेमुळे बदललेली गणित, त्यामधील आरक्षणे, आणि काही माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता, निवडणुका लांबल्याने अनेक माजी नगरसेवकांचा नागरिकांशी असलेला कनेक्ट तुटला आहे. त्यामुळे लोक संपर्काचा अभाव दिसून येत आहे तसेच इतर पक्षातील स्ट्रॉंग उमेदवारांचे होणारे इनकमिंग या कारणांमुळे माजी नगरसेवकांना सर्वांना घरी बसावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे जे 98 नगरसेवक विजयी झाले होते, त्यातील 35 ते 40 जणांच्या उमेदवारांना पक्ष शॉक देण्याच्या तयारीत आहे.

पुणे महापालिका निवडणुकी संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होत असून या बैठकीमध्ये पुण्यातील नेत्यांनी जी पहिली यादी तयार केली आहे त्या यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही यादी निश्चित झाल्यानंतर त्या यादीतील नेत्यांना खाजगी मध्ये निवडणुकीचं काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात येणारा आहेत. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होणार आहे जेणेकरून नाराजी टाळण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT