Pune BJP Candidate List Sarkarnama
पुणे

Pune BJP Candidate List : भाजप उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला! पहिल्या यादीत 62 नावांवर शिक्कामोर्तब, शिवसेनेला 20 जागा?

Pune Municipal Election 2026 Candidate List: भाजपने मागील महापालिका निवडणुकीमध्ये ज्या जागा जिंकल्या होत्या त्यातील 62 जागांची यादी फायनल केली असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या जागांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Sudesh Mitkar

PMC Election News: पुणे महापालिका निवडणुक भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रित युतीमध्ये निवडणूक लढणार आहे. या युतीबाबतची प्राथमिक बोलणी सुरू असतानाच भाजपने पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. भाजपच्या 62 उमेदवारांची पहिली यादी 26 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ही पहिली यादी जाहीर करण्यापूर्वी मुंबईमध्ये आज (मंगळवार) वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. तेच या बैठकीपूर्वी भाजपचे रखडलेले माजी नगरसेवकांचे प्रवेश होण्याची शक्यता देखील आहे. शिवसेनेसोबतच्या युतीचा विचार केल्यास शिवसेने कडून 41 जागांचा प्रस्ताव भाजपला देण्यात आला आहे. मात्र भाजप 10 पेक्षा अधिक जागा सोडण्याच्या तयारी दर्शवलेली नाही.

याच दरम्यान भाजपने मागील महापालिका निवडणुकीमध्ये ज्या जागा जिंकल्या होत्या त्यातील 62 जागांची यादी फायनल केली असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या जागांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामधील बहुतांश उमेदवार हे माजी नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान भाजपकडे 105 माजी नगरसेवकांचं संख्याबळ आहे. नुकतेच 11 माजी नवरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या 116 जागा भाजपने निश्चित केल्या आहेत. त्या जागांवर भाजप हमखास लढणार आहे. तसेच 5 ते 10 जागा रिपाईला देखील सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे एकूणच वाटाघातीनंतर शिंदेंच्या सेनेच्या वाटेला 20 जागा येण्याची शक्यता आहे.

सर्व पार्श्वभूमी वर भाजपने आपली पहिली यादी निश्चित केली आहे. उमेदवाराला जास्तीत जास्त वेळ मिळावा आणि त्या ठिकाणच्या इतर इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी अवधी मिळावा या दृष्टिकोनातून ही पहिली यादी आता शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT