Angry BJP worker Yuvraj Kuchekar reacting after denial of ticket during Pune Municipal Corporation elections, expressing resentment over imported candidates and leadership decisions. Sarkarnama
पुणे

Pune BJP News : भाजपला आम्ही वाढवलं, काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी नाही... तिकीट कापलेल्या कार्यकर्त्याचा थेट 'उमेदवार पडणारच' म्हणून शाप

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज कार्यकर्त्याने आयात काँग्रेस उमेदवार पडणारच असा शाप देत खासदार-आमदारांवर अन्यायाचा आरोप केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना पक्ष आपल्याला संधी देईल आपल्या आत्तापर्यंतच्या निष्ठेचा फळ मिळेल अशी अपेक्षा होती. पण शेवटच्या क्षणी देखील उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेते मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे पाहायला मिळालं.

ही नाराजी सर्वच पक्षांमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे पक्षांनी संधी न दिल्याने काहींनी सोशल मीडियावर व्यक्त होत आपल्या भावनांना वाट करून दिली. काहींनी माध्यमांसमोरच अश्रू अनावर झाले. तर काहींनी थेट पक्ष नेत्यांचे पोस्टर फाडले आणि काहींनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला. पुण्यामध्ये देखील सर्वच पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगाचं पाहायला मिळालं.

सर्वाधिक नाराजी भाजपमध्ये उफाळून आली. इतर पक्षातील नेत्यांना आयात करून उमेदवारी देण्यात आल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. अशाच एक कार्यकर्त्याने थेट शापच देऊन टाकल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष युवराज कुचेकर यांना पक्षाने तिकीट नाकारलं त्यामुळे ते उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार योगेश टिळेकर यांच्यावर चांगलेच भडकले.

युवराज कुचेकर म्हणाले, मी 22 वर्षांपासून भाजप मध्ये काम करतोय पण भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे. काँग्रेसचे आयात उमेदवार आमच्या बोकांडी आणून ठेवले आहेत. आमदाराने सांगितलं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी तिकीट कापलं, तर मुरलीधर मोहोळ यांनी आमदार योगेश टिळेकरांनी हे केलं असल्याचं सांगितलं. मग आम्ही न्याय मागायला गेलो मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही असं कुचेकर म्हणाले.

पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसने (Congress) नाही, असे म्हणत पक्षात कार्यकर्ते नव्हते का? असा सवाल कुचेकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच पेटवून घेणार नाही, आत्मदहन करणार नाही, पण हे आपोआप पेटणार आहेत. कारण काँग्रेसचा आयात उमेदवार 100% पडणार आहे. म्हणत काही देव-देवतांचं नाव घेऊन कुचेकर यांनी थेट शापच देऊन टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT