Pune Mayor Manjusha Nagpure and House Leader Ganesh Bidkar hold separate meetings, leading to confusion within the municipal administration.  Sarkarnama
पुणे

PMC News : महापौर नागपुरे, सभागृह नेते बीडकर यांच्या स्वतंत्र बैठका! प्रशासन ‘कन्फ्युज', कोणाचा आदेश पाळायचा..., भाजपमध्ये मतभेद?

PMC BJP Manjusha Nagpure Ganesh Bidkar : महापौरांच्या बैठकीला सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष उपस्थित नव्हते. उपमहापौर तर कोणत्याच बैठकीत दिसले नाहीत.

Sudesh Mitkar

Pune News : अवकाळी पावसाने शहरात मोठी तारांबळ उडवली. पाऊस थांबला तरी महापालिकेत मात्र बैठकांचा सिलसिला सुरूच आहे. महापौर आणि सभागृह नेते यांनी स्वतंत्र बैठका घेतल्यामुळे प्रशासनाला नक्की कोणाचे आदेश पाळायचे, यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांचे हाल झाले. अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला. पालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या, पण सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी वेगवेगळ्या बैठका घेत असल्याने नियोजनात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी शुक्रवारी सर्व विभागप्रमुख, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेतली. यात प्रशासनाला चांगलेच फैलावर घेण्यात आले. या बैठकीला सत्ताधारी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवारी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र बैठक बोलावली. नवीन पालिका इमारतीत झालेल्या या बैठकीला आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त माधव जगताप, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही!

महापौरांच्या बैठकीला सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष उपस्थित नव्हते. उपमहापौर तर कोणत्याच बैठकीत दिसले नाहीत. महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यांनी एकत्र बैठक घेऊन नियोजन करणे गरजेचे असताना, वेगवेगळ्या बैठका घेतल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे महापालिका प्रशासन पूर्णपणे बुचकळ्यात पडले आहे. अधिकारी-कर्मचारी आता नक्की कोणाचे आदेश मानायचे यावर विचार करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT