Security personnel and election officials manage crowds outside a Pune polling booth after allegations of EVM malfunction and voting irregularities during municipal elections. Sarkarnama
पुणे

PMC Election News : पुण्यात 10 वेळा बटन दाबलं तरी मत भाजपलाच! शाई पुसण्याच्या प्रकारानंतर आणखी एक दावा व्हायरल

Pune Municipal Election News :पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग 25 मध्ये ईव्हीएममधून भाजपलाच मत जात असल्याचा आरोप झाल्याने मतदान काही काळ थांबले, मशीन बदलण्यात आली आणि निवडणूक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Sudesh Mitkar

Pune PMC News : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक 25 मधील शिवाजी मराठा हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे आणि मनसे उमेदवार गणेश भोकरे यांनी या केंद्रावरील मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली.

एक मतदाराने दावा केला की, त्याने राष्ट्रवादीचे बटन दाबले असता मत भाजपच्या चिन्हाकडे (कमळ) जात असल्याचे दिसले. त्याने तब्बल दहा वेळा बटन दाबूनही त्याच कमळ चिन्हाला प्रकाश येत असल्याचा आरोप केला. यामुळे मतदार आणि पक्षप्रतिनिधींमध्ये संताप व्यक्त झाला आणि केंद्राबाहेर प्रचंड गर्दी जमली.

या आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करत खोली क्रमांक 2 आणि 4 मधील ईव्हीएम मशीन बदलण्याचा निर्णय घेतला. मशीन बदलण्याच्या कालावधीत मतदान प्रक्रिया काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. यामुळे केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात मतदारांची रांगा लागल्या आणि प्रचंड गर्दी झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरित तांत्रिक पथक बोलावून मशीन बदलली त्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. मात्र या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळी शाई पुसण्याचा प्रयत्न

पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर लावलेल्या मतदानाच्या शाई (इंडेलिबल इंक) सहज पुसली जाण्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहे. अनेक ठिकाणी मार्कर पेनचा वापर केल्यामुळे ही शाई फिनर किंवा सॅनिटायझरने लगेच निघत असल्याचे मतदार सांगत आहेत, ज्यामुळे दुबार मतदान किंवा बोगस मतदानाचा संशय वाढला आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 (नहे, वडगाव बुद्रुक, धायरी) मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्राबाहेर मतदानानंतर बोटावरील शाई लिक्विड किंवा थिनरच्या साहाय्याने पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेच्या (Congress) कार्यकर्त्यांनी पकडले आणि त्याला चोप दिल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT