Shrinath Bhimale filing nomination for Pune Municipal Corporation Standing Committee Chairman as party leaders gather ahead of crucial chairman election. Sarkarnama
पुणे

Shrinath Bhimale : श्रीनाथ भिमालेंच्या मार्गातील अडसर निवडणुकीआधीच दूर? घड्याळाचा गजर 'लेट', चर्चांना उधाण...

PMC Standing Committee Election : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले व सुहास टिंगरे यांनी अर्ज दाखल केले. टिंगरे यांचा अर्ज उशिरा झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सुहास टिंगरे यांनी अर्ज दाखल केला. येत्या सोमवारी (ता.23) अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी जाहीर झाल्यानंतर महापौर पदी मंजूषा नागपुरे यांची वर्णी लागली.

त्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांचा हिरमोड झाला होता. मात्र पक्षाने गणेश बिडकर यांना सभागृह नेतेपदाची संधी दिली, त्यांना भाजपकडून सभागृह नेते पद दिल्याने. महापालिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणारे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भिमाले यांना भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती.

स्थायी समितीसह शहर सुधारणा, क्रीडा, शिक्षण, महिला व बाल कल्याण, नाव समिती, विधी समित्यांच्या सदस्यांची मागील आठवड्यात निवड झाली होती. तर बुधवारी (ता.18) दुपारपर्यंत स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सकाळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव निश्‍चित केल्याचे पत्र सभागृह नेते गणेश बिडकर यांना पाठविले. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांसमवेत भिमाले यांनी बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सुहास टिंगरे यांचा अर्ज दुपारी सादर झाला. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समितीसाठी विशेष सभा घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी सतीशकुमार खडके यांच्या उपस्थितीत हि निवडणूक होणार आहे.

निवडणूक बिनविरोध होणार ?

भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुहास टिंगरे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज दाखल केला. भिमाले यांनी साडे अकरा वाजता, तर टिंगरे यांनी दुपारी 1 वाजून 1 मिनीटांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या वेळेनंतर टिंगरे यांचा अर्ज दाखल झाला आहे. टिंगरे यांना जाणीवपूर्वक उशिरा अर्ज दाखल करण्यास लावला की त्यांना खरोखरच उशिरा झाला, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी टिंगरे यांचा अर्ज बाद होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास हि निवडणूक बिनविरोध होऊन श्रीनाथ भिमाले यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT