Kishor Aware
Kishor Aware  Sarkarnama
पुणे

Kishor Aware Murder Case Update : आवारे खून प्रकरणात नवा ट्विस्ट; माजी नगरसेवकाच्या मुलानंतर पित्याचाही खूनात आढळला सहभाग

सरकारनामा ब्यूरो

Maval Crime News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक किशोर आवारे (Kishor Aware) यांची १२ मे रोजी भरदिवसा तळेगाव नगरपरिषद आवारातच निर्घूण हत्या झाली होती. ती त्यांच्याच समितीच्या माजी नगरसेविका हेमलता खळगे यांचा मुलगा गौरवने सुपारी देऊन केल्याने त्याला अटक झालेली आहे. आता त्याच्या वडिलांचाही या खूनात सहभाग आढळला आहे.

गौरवचे वडिल चंद्रभान ऊर्फ भानू खळदे आणि आवारे यांच्यात तळेगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याच्या केबिनबाहेर एका कामावरून गेल्या डिसेंबरमध्ये वाद झाला. त्यात आवारेंनी खळदेच्या कानशिलात लगावली होती. सर्वांसमोर मारल्याने वडिलांचा अपमान झाल्याने चिडलेल्या गौरवने या अपमानाचा बदला म्हणून आवारेंचा सुपारी देऊन खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे तो राजकारणातून झाल्याच्या शक्यतेच्या चर्चांना तूर्तास छेद बसला आहे.

दरम्यान, मुलानंतर (गौरव खळदे) आता बापाचाही (भानू) आवारे खूनात सहभाग असल्याचे समोर आले आहे. गौरवच्या चौकशीतून ही बाब स्पष्ट झाली. आवारे खूनाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस (Police) आयुक्त (एसीपी) प्रेरणा कट्टे आणि देहूरोड विभागाचे एसीपी पद्माकर घनवट यांनी याला दुजोरा दिला. आवारेंच्या खूनानंतर भानू फरार झालेला असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत, असे कट्टे यांनी सांगितले.

भानू खळदे याने काही महिन्यांपूर्वी शिरगाव पोलीस ठाण्यात त्याचे परवानाधारक पिस्तुल हरवले असल्याची फिर्याद दिली होती. त्याच पिस्तलाने आवारे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. कारण त्यांच्या शरीरात हरवलेल्या याच पिस्तूलातून झाडलेल्या काडतूसांच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे भानू खळदेने काडतुसांसह पिस्तूल हरवल्याची दिलेली फिर्याद खोटी ठरणार आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ती दिली होती का, हे त्याच्या तपासातूनच कळणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT