Police authorities announce the suspension of officer Manisha Pukale following allegations linked to a prostitution case. sarkarnama
पुणे

Pune Police : धक्कादायक! मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा; देहविक्री व्यवसायात ढकलले! महिला पोलिस कर्मचारी निलंबीत

Pune Police Women Safety : मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीला महिला पोलिस कर्मचाऱ्याने कुंटणखाण्याच्या मालकीनीच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : मदतीसाठी पोलिस ठाण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी सौदेबाजी झाली असल्याच देखील आरोप करण्यात आला आहे. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस हवालदारावर गंभीर आरोप ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव मनिषा पुकाळे असे आहे.

सुमारे एक महिन्यापूर्वी निलंबीत महिला पोलिसी कर्मचारी रात्रीच्या गस्तवर होती. तेव्हा एका तरुणीने येवून ती बांगलादेशी असल्याचे सांगून तिचेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची कैफीयत मांडली. महिला पोलिस असल्याने आपल्याला मदत मिळेल असे तिला वाटले. मात्र त्या महिला पोलिस कर्मचाऱ्या त्या तरुणीला शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले आणि तिथे कुंटणखाण्याच्या मालकीनीला बोलावून त्या तरुणीला पुन्हा तिच्या स्वाधीन करत तिला पुन्हा देहविक्री व्यवसायत ढकलले.

महिला पोलिस कर्मचाऱ्याने कुंटणखाण्याच्या मालकीणीशी संशयास्पद बोलणी करून मदत मागणाऱ्या बांग्लादेशी तरुणीला तिच्या ताब्यात दिले. तसचे या घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अथवा आपले तपास पथकाचे प्रभारी अधिकारी यांना काही एक माहिती दिलेली नाही. तसेच पिडीत मुलीस कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत केलेली नाही.

या प्रकाराची माहिती उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. प्राथमिक चौकशीत कर्तव्याच्या बाबतीत गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा आढळून आला. याप्रकरणी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT