Crime news update
Crime news update Sarkarnama
पुणे

Pune Crime News : गेले विनयभंगातील आरोपी पकडायला, २७ वर्षे फरारी खूनीही सापडला

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : या महिन्यात म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडायला पिंपरी-चिंचवडचे पोलिस उस्मानाबाद जिल्ह्यात गेले. त्यांनी तो आरोपी पकडलाच. त्याचवेळी गेली २७ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्याही त्यांनी मुसक्या आवळल्या.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकने ही कामगिरी केली. योगायोगाची बाब म्हणजे २०२३ चा विनयभंग आणि १९९५ चा खूनाचा असे दोन्ही गुन्हे भोसरी पोलिस ठाण्यातीलच आहेत. तेथे १९९५ मध्ये चारित्र्याच्या संशयावरून बायकोच्या डोक्यात दगडी पाटा डोक्यात घालून रामा पाराप्पा कांबळे ऊर्फ लोखंडे याने तिचा निर्घूण खून केला. त्यानंतर तो फरार झाला.

गेली २७ वर्षे तो फरार होता. राम कोडिंबा बनसोडे असे नाव बदलून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. एवढेच नाही तर नव्या नाव्याने आधार कार्ड बनवून बॅंक खाते उघडल्याने त्याचा संशय आला नव्हता. मोलमजुरी करून राहत होता. तसेच त्याने दुसरे लग्नही केले होते.

कांबळेच्या गावातीलच (कोळनूर पांढरी, ता.लोहारा,जि.उस्मानाबाद) महेश भीमराव कांबळेविरुद्ध भोसरीत विनयभंगाचा गुन्हा या महिन्यात दाखल झाला होता. तो ही गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. म्हणून त्याचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे पथका कोळनूर पांढरीला गेले. त्यांनी महेश कांबळेला पकडले. त्याच गावचा रामा कांबळे हा ही रहिवासी असल्याने त्याचीही पोलिसांनी चौकशी केली.

त्यावेळी तो सध्या मावळ तालुक्यात (जि.पुणे) एका वीटभट्टीवर काम करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने लगेचच या वीटभट्टीवर जाऊन रामा कांबळेच्या मुसक्या आवळल्या. अशारितीने ३९ व्या वर्षी खून केलेल्या कांबळेला २७ वर्षानंतर तो ६६ वर्षाचा असताना पोलिसांनी पकडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT