Medical negligence
Medical negligence  
पुणे

चुकीच्या उपचाराने पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू: साडेतीन वर्षांनंतर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : रोग एक आणि उपाय भलताच केल्याने पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-chinchwad) एका डॉक्टरवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. प्रदीप एच. पाटील असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी पोलिस हवालदारांचे नाव संतोष तुकाराम भागवत (वय ४८) हे आहे.

या गुन्ह्याचा तपास पीएसआय संगीता गोडे करीत आहेत. संगीता गोडे यांनी सरकारनामाला दिलेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या विशेष शाखेत सध्या कार्यरत भागवत यांच्या पत्नी मंजूषा यांच्यावर १ ते ३ सप्टेंबर २०१८ असे तीन दिवस उपचार करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाला होता.

पण, डॉ. पाटलांनी त्यांच्या रक्त तपासण्या करीत त्यांच्या रक्तातील प्लेटलेटस हा घटक कमी झाल्याचे निदान केले. त्यानुसार मनाला येईल ते उपचार सुरु केले. परिणामी साधा ताप असलेल्या या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे डॉ. पाटील यांनी त्यांना थेरगाव येथील बिर्ला या खासगी पंचताराकिंत रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार ४ तारखेला त्यांना तेथे अॅडमिट करण्यात आले.मात्र,दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.

न्यूमोनिया झाला असताना प्लेटलेटस कमी झाल्याचे सांगून तसे उपचार या डॉक्टरने केल्याने एका पोलिस हवालदाराच्या पत्नीला आपला जीव २०१८ मध्ये हकनाक गमवावा लागला. त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षांच्या लढ्यानंतर डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (१० एप्रिल) डॉ. पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत म्हणजे साडेतीन वर्षे लढा देत या हवालदाराने लढा देत आपल्या मृत पत्नीला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच तो फरार झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

साडेतीन वर्षे एवढ्या विलंबाने गुन्हा दाखल का झाला,अशी विचारणा केली असता मेडिकल असोसिएशनच्या समितीकडे अशी प्रकरणे जातात. त्यांनी त्याची सखोल शास्त्रीय चौकशी केली.त्यांचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई झाल्याचे तपासाधिकारी गोडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT