Pimpri-chinchwad News
Pimpri-chinchwad News 
पुणे

आरक्षण मिळो न मिळो, राजकीय पक्ष ओबीसींना कोटा देणार

सरकारनामा ब्युरो

Pimpri-chinchwad latest News

पिंपरी -चिंचवड : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Reservation) संपुष्टात आले असले तरी ते परत मिळेल, अशी सर्वच राजकीय पक्षांना अपेक्षा आहे. तर राज्यात महापालिका निवडणूकाही जाहीर झाल्या आहेत. अशातच राजकीय पक्षांनी ओबीसींना त्यांचा कोटा देण्याची तयारी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडची प्रभाग रचना जाहीर झाली असून मंगळवारी (ता. ३१) अनुसूचित जाती, जमाती व महिलांसाठीच्या जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.त्यातच निवडणूक आयोगाकडून केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यताही शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाले, तसे आपल्यालाही मिळेल, अशी अपेक्षा राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर न्यायालयात सादर करून त्यावर १५ जूनला निकाल लागणे अपेक्षित आहे.

तरीही ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर ओबीसींना त्यांच्या कोट्यानुसार उमेदवारी द्यायची, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणीही राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे.

२०१७ च्या निवडणुकीत ३५ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यावेळी महापौरपदाचे आरक्षणही ओबीसी पुरुष जागेसाठी निघाले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपने चऱ्होलीतील नितीन काळजे आणि नंतर चिखलीतील राहुल जाधव यांना संधी दिली.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला हवे, ही पक्षाची भूमिका आहे. पण जर ते मिळाले नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार भाजपकडून ओबीसींना उमेदवारी दिली जाईल. त्यासाठी आम्ही पक्षांतर्गत ऑनलाइन उमेदवारी अर्ज मागविण्यात आले असून ओबीसी प्रवर्ग नमूद करण्यात आले असल्याते पिंपरी-चिंचवडचे भाजपचे प्रवक्ता अमोल थोरात यांनी सांगितले.

तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय लोखंडे म्हणाले की, ओबीसींना वगळून निवडणुका होणार नाहीत, अशी भूमिरा पक्षाच्या नेतृत्वाने घेतली आहे. तरीही निवडणूक झालीच, तर राष्ट्रवादीकडून ओबीसींना उमेदवारी दिली जाईल. गेल्यावेळी ओबीसी उमेदवार असलेल्या प्रभागातच यावेळीही उमेदवारी दिली जाईल, असंं दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष शरद पवार यांंनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT