Ajit Pawar, Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Pune Politics : "विरोधकांनाही अजितदादाच पालकमंत्री हवेत...", पालकमंत्रिपदावरून महायुतीतीत रस्सीखेच

Pune Mahayuti Politics : महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद कोणत्या दादांकडे जाणार याबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. महायुतीने याआधी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा दिली होती. मात्र अजितदादा युतीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पुण्याची सूत्र आपल्या हातात घेतली.

Sudesh Mitkar

Pune News, 07 Dec : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अखेर देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मंत्रिपदाचं वाटप अद्याप फायनल झालेलं नसताना महायुतीमध्ये आता पालकमंत्रिपदावरून देखील वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महायुतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) सहभागी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद कोणत्या दादांकडे जाणार याबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. महायुतीने याआधी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा दिली होती. मात्र अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पुण्याची सूत्र आपल्या हातात घेत पालकमंत्रिपद देखील स्वतःकडे ठेवलं.

आता महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे (BJP) स्थानिक नेते पुण्याचे पालकमंत्रिपद आपल्याकडे राहावं यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देखील पालकमंत्री अजित पवारच होणार असं ठाम विश्वास व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुण्याचा दादा कोण याकडे सर्वांचाच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पालकमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल ते जी जबाबदारी देतील ती मी पार पाडणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावर आपलाही दावा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "देशभरामध्ये अजित पवारांना पुण्याचे सुपुत्र म्हणून ओळखलं जातं. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी एक आदर्श घालून दिला आहे. अजित पवार हे पालकमंत्री म्हणून पहाटेपासूनच कामाला लागतात.

प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून सर्व समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. अजित पवार पालकमंत्री होतील याबाबत आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र विरोधकांची देखील अजितदादाच पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा असते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT