<div class="paragraphs"><p>Pradip kand</p></div>

Pradip kand

 

sarkarnama

पुणे

‘साथ कुणी दिली...ऽ बारामती...ऽऽ’ : कार्यकर्त्यांच्या या घोषणेबाबत कंद म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (pradip kand) यांनी पतसंस्था प्रवर्गातून विजय मिळविला. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी साथ कुणी दिली...बारामती... (baramati)अशा घोषणा दिल्या. त्याबाबत विजयानंतर कंद म्हणाले, ‘बॅंकेच्या या निवडणुकीत मला सर्वांनी साथ दिली आहे, एवढंच मी त्याविषयी सांगू शकतो,’ असे म्हणत निवडणुकीतील मदतीचे गुपित कायम ठेवले. (Pradeep Kand said about help in the election of District Bank)

निवडणुकीतील विजयानंतर माध्यमाशी बोलताना प्रदीप कंद म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जाण्याची संधी मिळाली आहे. माझ्या विजयाचे श्रेय सर्वांना आहे. त्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा इतरही सर्व पक्षांचा त्यात समावेश आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा बॅंकेत जाण्याची संधी दिल्याबद्दल या सर्व पक्षप्रमुखांचे मी मनापासून आभार मानतो.

साथ कुणी दिली... बारामती...., साथ कुणी दिली... भोर..., साथ कुणी दिली... शिवसेना... अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. त्याबाबत प्रदीप कंद म्हणाले की सगळ्यांनी मला या निवडणुकीत साथ दिली आहे, एवढं मी यावेळी सांगू शकतो. या सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्यासाख्या कार्यकर्त्याची राजकारण करण्याची एक पद्धत आहे की कुणावरही टीका करून मला राजकारण करण्याची सवय नाही. सकारात्मक दिशेने आपल्याला राजकारण करायचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर आपण मोठे होतो. पतसंस्थेच्या आणि बॅंकेच्या मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या ज्या सहकाऱ्यांनी तालुका-तालुक्यांत जाऊन मेहनत घेतली, त्यांना धन्यवाद देतो.

मी चांगलं काम करण्यासाठी बॅंकेत गेलो आहे, त्यामुळे आगामी पाच वर्षांत बॅंकेत चांगलंच काम करेन. पतसंस्था आणि बॅंकेच्या हिताची भूमिका घेऊन लढेन, असेही कंद यांनी शेवटी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT