Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल करण्याच्या या प्रसंगाला एका वादाची किनार चिटकली. अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेले जिरेटोप भेट म्हणून दिले. इतकेच नाही तर जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवले. आता यावरुन वाद उफाळून आल्यानंतर पटेल यांनी यापुढे असा प्रकार होणार नाही, काळजी घेऊ, असे पटेलांनी ट्वीट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र स्पष्ट शब्दात माफी मागितल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा इशारा संभाजी ब्रिगेड यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी आजही संताप व्यक्त होत आहे. संभाजी ब्रिगेड आता या मु्द्द्यावर अधिक आक्रमक झाली आहे. 'नुसतं ट्विट करून काळजी घेतो, असं सांगून चालणार नाही. 24 तासाच्या आत महाराष्ट्राची माफी मागा नाहीतर आम्ही प्रफुल्ल पटेल यांना काळं फासल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खुला इशारा संभाजी ब्रिगेड ने दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भावना नसतील, पण आम्हाला आहेत. छत्रपती शिवाराय आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांचा अवमान कुणाकडून घडला असेल, त्यांनी स्पष्ट शब्दात माफी मागावी. दुसरं म्हणजे एवढं सगळं झालं तरी सुद्धा अजित पवार (Ajit Pawar) का गप्प? असा प्रश्न ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितीत केला आहे. पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.