Prajakta Mali Latest News in Marathi, loudspeaker controversy News in Marathi sarkarnama
पुणे

ट्रोल होताच प्राजक्ताने भोंग्यावरील ट्विट केलं डिलीट

Prajakta Mali :उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा बाळगते...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मशिदींवरील भोंग्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. भोंगे उतरवण्यासाठी त्यांनी 4 मे चा अल्टिमेटम दिला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी याबाबतचा पुनरूच्चार केल्याने राज्यातील चांगलेच वातावरण तापले आहे. औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर पोलिसांकडून कारवाईचे संकेत मिळत असताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा बाळगते, असे ट्विट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मात्र, यावरून ट्रोल होताच लगेचच केलेले ट्विट डिलीट केले आहे. (Loudspeaker controversy News in Marathi)

राज ठाकरे यांनी अलिकडे घेतलेल्या आपल्या काही सभांमध्ये मशिदींवरील भोंग्याचा विषय चांगलाच लावून धरला आहे. औरंगाबाद येथील सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे आधी उतरवा त्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवू, असे सांगितले. तर, ज्या ठिकाणी सांगूनही मशिदींवर भोंगे सुरु राहत असतील तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचाही आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. याप्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांनी याकडे लक्ष घालावे, असे आवाहनही यावेळी केले होते. आणि सांगूनही कुणी ऐकत नसेल तर पुढे महाराष्ट्रात काय होईल, हे मला माहित नाही, असा इशारा ठाकरेंनी आपल्या भाषणात दिला होता. त्यामुळे राजकारण अजूनच तापले आहे.

बुधवारी यावरून काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना या प्रकरणी प्राजक्ता माळी हिने आज ट्विट करून आज 3 तारिख उद्यापासु गोंगाट बंद होईस असे, म्हणत सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आणि राज ठाकरे यांना भोंगे उतरविण्याची एकप्रकारे आठवणच करून दिली होती. मात्र, या ट्विटवरून ट्रोल होताच प्राजक्ताने आपले ट्विट लगेचच डिलीट केले आहे.

प्राजक्ता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असो....आज 3 तारिख, उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. # शांतताप्रियधन्यवाद मा. श्री राज ठाकरे @raj_shrikant_thackeray, असे ट्विट केले होते.

दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर राज ठाकरेंवरील या कारवाईसंदर्भात गृहमंत्रालयाची आज सकाळपासून खलबत सुरु असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. आज सकाळी वळसे पाटील यांची पोलिस महासंचालकांसह गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडत आहे. त्याचवेळी पोलिस औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याही घरी पोहचले आहेत. त्यांच्याशी पोलिसांची चर्चा सुरु आहे. आता राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT