Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Constituency : शिरुरच्या लढतीत ट्विस्ट! 'वंचित'चा उमेदवार वाढवणार कोल्हे - आढळरावांचे टेन्शन

Prakash Ambedkar Vanchit : मंगलदास बांदलांची उमेदवारी रद्द केल्यानंतर शिरुरमध्ये वंचित उमेदवार देणार की नाही, अशी चर्चा होती. मात्र माजी प्राचार्य डॉ. अन्वर शेख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिरुरची लढत पुन्हा तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Uttam Kute

Pune Political News : राज्याचे लक्ष लागलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत शनिवारी (ता. 20) पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मंगलदास बांदलानंतर हटवल्यानंतर `वंचित`ची पुन्हा एन्ट्री झाली आहे. त्यामुळे तेथे थेट म्हणजे दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता आहे. आता `वंचित`चा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे की महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना बसणार, याची चर्चा आहे.

वंचित बहुजन आघाडीने Vanchit 3 एप्रिलला शिरुर लोकसभेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल या पैलवानाला तिकिट दिले. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तीनच दिवसांत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून त्यांची उमेदवारी रद्द केली. त्यानंतर तेथे ते उमेदवार देणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र शनिवारी त्यांनी माजी प्राचार्य डॉ. अन्वर शेख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिरुरची लढत पुन्हा तिरंगी होण्याची शक्यता आहे.

डॉ. शेख यांच्या एन्ट्रीमुळे शिरुरच्या रिंगणात दोन प्रमुख उमेदवार हे डॉक्टर झाले आहेत. आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe हे एमबीबीएस म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले, तर डॉ. शेख हे साहित्यातले (पीएचडीधारक) आहेत. तसेच शिरुरच्या लढतीतून आऊट झालेले बांदल शिरुर विधानसभा, तर डॉ. शेख हडपसर विधानसभा मतदारसंघातील आहेत. तेथे मुस्लिम मतदार त्यातही कोंढव्यात मोठ्या संख्येने आहेत. हडपसर, भोसरी या दोन मतदारसंघात गेल्यावेळी शिवाजीराव आढळराव-पाटील यांना लीड मिळाले होते. दरम्यान, शेख यांच्यामुळे शिरुरमध्ये आणखी एका उच्चशिक्षित उमेदवाराची एन्ट्री झाली आहे.

बांदल 6 एप्रिलला आऊट झाल्यानंतर आठवड्यापूर्वीच डॉ. शेख यांनी `वंचित`चे प्रमुख बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यांनी थेट शिरुरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली. ती मान्य होऊन त्यांचे नाव जाहीर झाल्याने कालपर्यंत शिक्षण क्षेत्रात असलेल्या डॉ. शेख यांचा आठवड्यातच राजकारणात प्रवेश झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सरकारनामा'शी बोलताना डॉ. शेख म्हणाले, तरुण वर्गाला कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी राजकारणात आलो आहे. पुना कॉलेजचे प्राचार्य राहिलेल्या डॉ. शेख यांचे सामाजिक क्षेत्रातही काम आहे. झोपडपट्टीतील वंचित,गरीब,गरजू पाचवी,सातवी,नववी नापास मुलांना थेट दहावीची परीक्षा देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT