Prakash Ambedkar  Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News : धनगर समाजाच्या अधिवेशनात गेलेल्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; थेटच बोलले, ओबीसींनी 'त्यांना' मतदान करू नये...

Prakash Ambedkar’s Bold Statement at Dhangar Community Convention : लोकांना सत्तेत आणणं हे काम महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.

Sudesh Mitkar

Pune News : सकल धनगर समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी धनगर समाजाने ओबीसींचे नेतृत्व करावे आणि राज्याची सत्ता हस्तगत करावी, असं सांगितलं. यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी एक महत्वपूर्ण विधानही केले आहे.

आगामी निवडणुकांमध्ये सत्ता ही ओबीसींनी घेतली पाहिजे, असे सांगताना आंबेडकर म्हणाले, ही सत्ता घेताना त्यांनी आरक्षणवादी जे लोक आहेत, म्हणजेच एससी आणि एसटी उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. मुस्लिम उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. मात्र ज्या सवर्णांनी आरक्षण संपवण्याची भूमिका घेतली आहे. त्या लोकांना ओबीसी लोकांनी मतदान करू नये, असं आवाहन मी केलं असल्याचं आंबेडकरांनी सांगितले.

ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत आणि तेवढीच नेतृत्व आहेत. मात्र आता आपली सगळ्यांची सामाजिक आणि राजकीय ओळख आता OBC म्हणून झाली पाहिजे. सगळ्यांना एकत्रित आणलं पाहिजे. सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्याची ओळख OBC झाली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच आपण 1980 पासून आम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आलो आहे, यात तसूभर देखील बदल केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी लोकांनी सत्ता आणली पाहिजे. ओबीसी लोकांनी सत्ता आणून मला मुख्यमंत्री करावे, अशी माझी मागणी नाही. मला मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायचं नाही, लोकांना सत्तेत आणणं हे काम महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.

धनगर समाज हा लढाऊ समूह आहे. त्यांनी इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे आता त्यांना विनंती असेल की ओबीसी लढ्याचं नेतृत्व त्यांनी करावं. त्या दृष्टिकोनातून मग जे २७ टक्के आरक्षण आहे. ते सत्ता मिळवून हे तेलंगणा राज्यासाराख ६२ टक्क्यांवर देखील नेता येईल, असे आंबेडकरांनी सांगितले.  

धनगर समाजाची आदिवासी समाजामधून आरक्षणाची जी मागणी आहे, त्याबाबत काही लोक सुप्रीम कोर्टात देखील गेले होते. सुप्रीम कोर्टाने याबाबत निकाल देताना धनगर आणि धनगड हे दोन वेगळे असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आरक्षण मिळवण्याचा तो मार्ग संपलेला आहे. म्हणून आता धनगर समाजाने महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन हे आरक्षण वाढवावं तरच समाजाला न्याय मिळेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT