पुणे

'मटका लागला म्हणजे काही होत नाही' : काकडेंच्या आकड्यावर जावडेकरांचे भाष्य

सरकारनामा ब्युरो

पुणे : "युती झाली नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल", असे भाकीत करणाऱ्या खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्याला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केले. 'मटका लागला म्हणजे काही होत नाही', अशा शब्दांत जावडेकर यांनी खासदार काकडेंच्या आकड्यांवर भाष्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक आणि विरोधकांची कोलकाता येथे झालेल्या रॅलीवर प्रतिक्रिया देण्यासाठी जावडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.

काकडे यांच्या भाकीतावर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रक काढल्याचे सांगत 'मी असल्या भाकीतांवर बोलत नाही', असे सांगत यावर अधिक भाष्य करणे जावडेकर यांनी टाळले. काकडेंच्या भाकितावर बोलणे टाळल्यानंतर त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत खासदार काकडे यांचे आकडे खरे ठरले होते, असा प्रश्न विचारला गेला, त्यावर जावडेकर म्हणाले, 'मटका लागला म्हणजे काही होत नाही'.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT