Prashant Jagtap addressing the media while responding sharply to Amol Mitkari’s criticism amid the ongoing NCP merger controversy in Maharashtra politics. Sarkarnama
पुणे

Prashant Jagtap : खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ म्हणणाऱ्या मिटकरींची प्रशांत जगतापांनी लायकीच काढली; म्हणाले, 'तडजोड करणाऱ्या, फुटकळ आमदाराच्या...'

NCP SP Prashant Jagtap resignation : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना लवकरच अंतिम स्वरूप येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 25 Dec : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत जवळपास निर्णय निश्चित झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतला आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जगतापावर बोचरी टीका केली होती.

या टीकेला प्रशांत जगताप यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना लवकरच अंतिम स्वरूप येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सुरू असलेल्या या चर्चांना प्रशांत जगताप यांनी विरोध केला होता.

एक विचारधारा घेऊन पुढे चाललेलो असताना पुन्हा अजित पवारांसोबत जाणं योग्य नसल्याची भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली होती. कुठेतरी प्रशांत जगताप हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास आडकाठी घालत असल्याचा चित्र पाहायला मिळत होतं.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली होती. 'अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय.

मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार,राजीनामा देणार,अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही.खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा', अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

तर मिटकरींच्या या टीकेवर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, 'मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक आणि फुटकळ आमदाराच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही.

ज्यांची ग्रामपंचायत ही निवडून येण्याची लायकी नाही त्यांच्यावर मी काय बोलावं? अमोल मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी आणि फुटकळ नेते आहेत. जे लोकांतून निवडून आलेले असतील त्यांनी माझ्याशी बोलावं', असं म्हणत प्रशांत जगताप यांनी अमोल मिटकरी यांना थेट लोकातून निवडून येण्याचं आव्हान दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT