पिंपरी : एसटी संप (ST strike) व आंदोलनाचा शनिवारी (ता.१३) सहावा दिवस होता. ३९ एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार संपावर तोडगा काढू शकले नाही. उलट आता संप आणखी चिघळला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते (विधान परिषद) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शनिवारी (ता.१३), सरकारला हल्लाबोल केला. गेंड्याच्या कातडीचे हे सरकार हा संप चिघळवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात त्याला हिंसक वळण लागले. तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असे ते म्हणाले. एसटी कामगारांची माथी भाजप भडकावीत असल्याच्या आरोप त्यांनी खोडून काढला. आम्ही गप्प बसतो. मग, तुम्ही न्याय द्या, असे ते सरकारला उद्देशून म्हणाले.
दरम्यान, आता एसटी संप चिरडण्याचे कारस्थान सरकारने सुरु केले आहे. मात्र, त्यांचा बाप, जरी आला, तरी हा संप चिरडू देणार नाही. कारण आता संपकरी करो या मरोच्या पावित्र्यात आहेत. त्यांचा हा लढा युनीयन, पक्ष वा नेत्याचा राहिला नसून तो जनतेचा झाला आहे. तसेच त्याला आमचाही सर्वशक्तीनिशी पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला. भविष्यात या संपाला हिंसक वळण लागले, तर त्याला सरकारच जबाबदार असेल असे ते म्हणाले. तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) एसटी आगारातील कर्मचारी आंदोलनात ते आज सामील झाले. त्यांना पाठिंबा जाहीर केला. प्रलोभनाला बळी न पडता एकजूट राखण्याचे आवाहन त्यांन केले. कारण अंतिम विजय आपलाच आहे, असे ते म्हणाले.
काही कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून कामावर बोलावून संप फोडण्याचे सरकारचे कारस्थान सुरु आहे, मात्र, ते यशस्वी होणार नाही. कारण बळी गेलेल्या ३९ बांधवांचे पाप कुणी आपल्या माथी घेणार नाही. सरकारने एसटी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ते तेवढे उसळी मारुन वर येईल. आतापर्यत ३९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचे सरकारला दुःख नाही. कारण या आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या सांत्वनाला एसटीचे अधिकारी वा मंत्री आले नाहीत. अजून किती बळी जाण्याची वाट ते पाहताहेत? आता अंत पाहू नका. नाही, तर संपाला हिंसक वळण लागेल. मग, त्याला सरकारच जबाबदारच असेल. म्हणून आता अधिक वाट न पाहता एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून न्याय द्यावा, असे आवाहन शेवटी दरेकर यांनी सरकारला केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.