पुणे : ऑर्थर रोड कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या शेजारी असलेली कोठडी सॅनिटाईज करून ठेवायला सांगा. त्या ठिकाणी मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत (Anil Parab And Sanjay Raut) यांची जागा नक्की आहे. त्यांना तिथे जावे लागणार आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुण्यात दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, ‘‘ खासदार राऊत यांना सर्वाधिक भीती वाटते ती प्रवीण राऊत यांची. ईडीच्या कोठडीत असलेला प्रवीण राऊत तपासात ईडीला काय माहिती सांगेल या भीतीने राऊत यांना ग्रासले आहे. प्रवीण राऊत यांच्या रूपाने खासदार राऊत यांचा एक पार्टनर जेलमध्ये गेला आहे. त्यामुळे आता अजित पाटकर जेलमध्ये गेले तर राऊत यांचे काय होणार असा प्रश्न खुद्द राऊत यांनाही पडल्याने ते घाबरले आहेत.’’
सोमय्या म्हणाले, ‘‘ खासदार राऊत व मंत्री परब यांची स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, भ्रष्टाचाराचे पुरावे इतके प्रचंड आहेत की त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही.मात्र, यातून वाचण्याचा प्रयत्न दोघांकडूनही सुरू असून माझ्यावर करण्यात आलेला हल्ला या कारस्थानाचा एक भाग आहे. पुण्यातील जम्बो कोवीडमध्ये सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचारावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा.त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पोलीस आयुक्त विक्रमकुमार व शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.मात्र, ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांना याचविण्यासाठी पोलीस कोणतीच कारवाई करीत नाहीत.’’
गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्याच ठिकाणी आज शहर भाजपाच्यावतीने सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. केलेली चुकीची कामे लपविण्यासाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला. मात्र,अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही.भ्रष्टाचाराच्या विरोधातील माझा आणि माझ्या पक्षाचा लढा यापुढेदेखील असाच चालू राहील. माझा लढा थांबविण्याची ताकद ठाकरे सरकारमध्ये नाही, या शब्दात सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.