Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : 'पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला; पण...'; अजित पवारांनी विरोधकांनी सुनावलं

Chaitanya Machale

Pune News : चांगले काम केलं तर कौतुक आणि काम बरोबर नसेल तर जागेवरच संबधित व्यक्तीला फैलावर घेणे, असा स्वभाव राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांचा असल्याचे सर्वांनाच माहित आहे. आपल्या कामाच्या शैलीमुळे आणि रोखठोक बोलण्यामुळे अजित पवार प्रसिद्ध आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रतील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावून अजित पवार यांनी थेट कात्रज - कोंढवा रस्त्यावर येऊन तेथील कामाची पाहणी केली. या रस्त्याबाबत आवश्यक त्या सूचना त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदारसंघाच्या बॉर्डरवर असलेल्या कामांची पाहणी तुम्ही आज केली. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. कोणाच्या बॉर्डरवर आणि आतमध्ये काही नाही. सगळीकडे लक्ष देणं हे माझं काम असल्याचं सांगत त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून फारकत घेत बाहेर पडलेल्या अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून सुळे यांच्या मतदारसंघात अधिकच लक्ष घालण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सोलापूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भावनिक झाले यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, गर्दी झाली म्हणून विरोधकांना त्रास झाला का? अशा शब्दात विरोधकांना त्यांनी टोला लगावला. सोलापूर येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. तसेच ते देखील आपल्या सारखेच माणूस आहे. ज्या माणसात माणुसकी असते. तोच भावूक होतो. तेथील घर पाहिल्यावर त्यांना देखील जुने दिवस आठवले असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कामाचे भूमिपूजन केले आणि नागरिकांना घरे देण्यास देखील ते आले. त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. 30 हजार घरांपैकी 15 हजार घरे देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्यात आली आहेत. त्या कामाचे विरोधकांनी कौतुक केले पाहिजे. अशा शब्दात अजित पवार यांनी सुनावले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT