Narendra Modi sarkarnama
पुणे

नरेंद्र मोदींनी असा नोंदवला पुणे मेट्रोबद्दल आपला अभिप्राय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (ता. ६ मार्च) पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन झाले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (ता. ६ मार्च) पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन झाले. यावेळी मेट्रोला ग्रीन सिग्नल देत पंतप्रधानांनी गरवारे महाविद्यालय ते आनंदनगरपर्यंत प्रवास केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या हस्ताक्षरात अभिप्रायही नोंदवला.

यामध्ये पंतप्रधान म्हणाले, आज मला अत्यंत आनंद होत आहे. कारण आज पासून पुणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सेवा सुरु होत आहे. पुण्यामध्ये नागरिकांना एक गतीमान आणि सुरक्षीत व पर्यावरण पुरक अनुकूल प्रवासासाठी एक पर्याय उपसब्ध होत आहे. मी सगळ्या पुणे करांना मेट्रोच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देतो, असा शब्दात मोदी यांनी आपला अभिप्राय नोंदवला.

या प्रवासावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. त्यांच्या सोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. पंतप्रधानांनी तिकीट काढून मेट्रोचा प्रवास केला.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या इमारतीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत मोदी शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांसाठी बनवलेला खास फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.

या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी आता उपलब्ध झाली आहे. त्यातील वनाझ ते रामवाडी हा 13 किलोमीटरचा मार्गा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मेट्रो मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा दूसरा मार्ग आहे. हा 12 किलोमीटरचा मार्ग असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटर मार्गाचे कामही पूर्ण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT