Pune News: खोट्या घोषणा करून कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यात आले असल्याची टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन अडीच महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. बंगळुरूच्या विकासासाठीही पैसे नाहीत, असे तेथील सरकार सांगत असल्याचा घणाघातही मोदींनी केला. पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. तेव्हा ते बोलत होते.
गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वी कर्नाटकातील जनतेसाठी विविध घोषणा केल्या होत्या. याच घोषणांवरून मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. कर्नाटकात खोट्या घोषणा करण्यात आल्या. तेथील सरकारकडे राज्याच्या विकासाठी देखील पैसे नाहीत. कर्नाटक सरकार स्वत:साठी राज्याची तिजोरी खाली करत असून अशीच परिस्थिती राजस्थानमध्येही असल्याची टीका मोदींनी केली. राजस्थानमध्ये कर्जाचा डोंगर वाढला असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपला साद देण्याचा प्रयत्न केला.
"महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासात मोठी भर घातली. यामध्ये पुण्याचा मोठा वाटा आहे. देशभरात लोकं भारताच्या विकासाची चर्चा करतात, या विकासात महाराष्ट्राची आणि पुण्याची देखील चर्चा होते. भाजप सरकार देशाच्या विकासाचे मंत्र घेऊन चालत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रकल्पामुळे दोन्ही शहरं सशक्त होत आहेत. पुणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे शहर आहे. देशात मेट्रो नेटवर्क वाढवण्यावर भाजप सरकारचा भर असून देशात 2014 पर्यंत 250 किमीपर्यंतही मेट्रो नेटवर्क नव्हते. पण आता अनेक शहरात मेट्रो नेटवर्क सुरू झाले. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर शहराचा समावेश आहे", असे मोदी म्हणाले.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.