Prime Minister Narendra Modi Sarkarnama
पुणे

PM Narendra Modi News: आम्ही एखाद्या रस्त्याचे नाव बदलले तरी काहींना पोटशूळ उठतो; मोदींची विरोधकांवर टीका

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान मोदींनी लोकमान्य टिळक यांचे महाराष्ट्र आणि गुजरातशी असलेले विशेष नाते सांगितले. याचवेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही टीका करत "आम्ही एखाद्या रस्त्याचे नाव बदलले तरी काहींना पोटशूळ उठतो", असा घणाघात केला.

"लोकमान्य टिळकांचं जसं पुण्याशी खास नातं आहे, तसंच गुजरातही टिळकांचं विशेष नातं आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लोकमान्य टिळक दोन महिने अहमदाबाद येथील तुरुंगात होते. १९१६ मध्ये म्हणजे ज्यावेळी इंग्रजांची राजवट होती. त्यावेळी अहमदाबादेत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यावेळी चाळीस हजार लोकं आले होते. त्याहून आनंदाची बाब म्हणजे त्यावेळी त्यांना ऐकण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल हे देखील तिथे होते", असेही त्यांनी सांगितले.

"लोकमान्य टिळकांच्या भाषणाने सरदार वल्लभभाई पटेलही खूप प्रभावित झाले. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांनी अहमदाबादमधील राणी व्हिक्टोरिया गार्डनमध्ये टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यावेळी सरदार पटेल यांच्यावर खूप दबाव आणला गेला. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ते सरदार पटेल होते".

"आपण पद सोडायला तयार आहोत, मात्र, टिळकांचा पुतळा तिथेच लागणार असे ठामपणे त्यांनी ब्रिटीशांना सांगितले. तो पुतळा उभारण्यात आला आणि १९२९ मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे लोकापर्ण करण्यात आले. त्यांचा तो पुतळा शांत मुद्रेतला आहे. ते पाहून लोकमान्य टिळक स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याकडे पाहत आहेत, असाच भास होतो", असं मोदी म्हणाले.

सरदार पटेल यांनी त्यावेळी संपूर्ण ब्रिटीश राजवटीलाच आव्हान दिले होते. मात्र, आजची स्थिती पाहा, आज आम्ही एखाद्या विदेशी आक्रमण कर्त्यावरून असलेल्या रस्त्याचे नाव बदलले तरी काही जणांना मोठे पोटशूळ उठतो, एखाद्या रस्त्यांचे नाव बदलले तरी विरोधक हंगामा करतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT