MPSC News: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीनं आज पुण्यात नवी पेठेत शास्त्री रोडवर आंदोलन करण्यात आलं. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या काही वर्षांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील (Pune) एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. आजही विविध मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
काही दिवसांपूर्वी आयोगाने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि सिलॅबसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये एमपीएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मात्र, यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
या आंदोलनावेळी विद्यार्थी म्हणाले की, "राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे ढकलत आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू," असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे. तसेच, आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेणारं ट्विट एमपीएससी आयोगाने केलं आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मान्य केलं जाणार नाही, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.