Pune Crime news, Pune News
Pune Crime news, Pune News  sarkarnama
पुणे

फार्म हाऊसवर शेत मजुराच्या मुलीवर बलात्कार

सरकारनामा ब्युरो

पुणे : फार्महाऊस वर कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेला न्याय मिळुन देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यामुळे प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.

विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आईवडील वास्तव्य आणि कामासाठी आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते.

आरोपीने या फार्म हाऊसच्या मागच्या मजुर खोल्यांच्या मागे या अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर शिक्रापुर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलिसांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT